Rhea Chakraborty Instagram
मनोरंजन

Rhea Chakraborty: 2 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा कमबॅक

सकाळ डिजिटल टीम

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) तिचा प्रियकर सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) दुःखद निधनानंतर दोन वर्षांनी कामावर परतली आहे. सुशांतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली आणि तेव्हापासून रिया सोशल मीडियापासून दूर राहून लो प्रोफाइल ठेवत आहे. आता, अभिनेत्री तिच्या नेहमीच्या रुटीनवर परतली असून, काम पुन्हा सुरू कराण्यास उत्साही आहे.

अलीकडे, रिया सोशल मिडीयावर मोटिवेशनल कोट्स पोस्ट करत असते. शनिवारी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कामावर परतताना तिच्या सध्याच्या मनःस्थितीची झलक दिली. व्हिडिओ शेअर करताना, रियाने लिहिले, "काल, मी 2 वर्षांनी परत कामाला सुरूवात केली आहे. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व लोकांचे खूप खूप आभार. काहीही असो, सूर्य नेहमीच चमकतो, नेव्हर गिव्ह अप!"

सुशांत सिंग राजपूतचे निधन झाल्यापासून रियाचे आयुष्य बदलून गेले आहे. मीडिया ट्रायल असो, किंवा सोशल मीडियावर सतत गुंडगिरी आणि ट्रोलिंग असो, तरुण अभिनेत्रीसाठी हा एक कठीण काळ आहे. तरीही, 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीला तिने दिवंगत बॉलिवूड अभिनेत्यासाठी एक भावनिक नोट लिहिली. "असा एकही क्षण नाही जिथे मला विश्वास आहे की तू आता इथे नाहीस. ते म्हणाले की वेळ सर्वकाही बरे करते परंतु तू माझा वेळ आणि माझे सर्व काही होतास. मला माहित आहे की तू आता माझा रक्षक बनून तुझ्या दुर्बिणीतून नजर ठेवून माझे रक्षण करत आहेस.”

रिया चक्रवर्तीला NCB ने सप्टेंबर 2020 मध्ये अटक केली होती. तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यालाही एनसीबीने अटक केली होती आणि डिसेंबरमध्ये त्याची सुटका झाली होती.

कामाच्या आघाडीवर, रियाचा शेवटचा चित्रपट 'चेहरे' (Chehre) मध्ये ती अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सोबत दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT