Riddhima's Silver sari look in ranbir-alia mehendi function. Google
मनोरंजन

रणबीरच्या मेहेंदी सोहळ्यात बहीण दिसली ग्लॅमरस,साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

रणबीरच्या मेहेंदी सोहळ्यात रिद्धिमा कपूरनं सिल्व्हर रंगाची साडी नेसली होती जिच्या किमतीवरुन चर्चा रंगलेली दिसली.

प्रणाली मोरे

रणबीर(Ranbir Kapoor) आणि आलियाच्या(Alia Bhatt) लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सगळेचजण उतसुक आहेत. कुटुंबात अनंदाचं वातावरण पसरलंय. आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा(Riddhima Kapoor) यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद सगळ्यांनीच पाहिला असेल. रणबीर कपूरच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये जिथे करिना कपूर पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात आपल्या सौंदर्यांनं अनेकांना घायाळ करताना दिसली होती,तिथे दुसरीकडे रिद्धिमा कपूर सुद्धा आपल्या ग्लॅमरस लूकनं लोकांच्या नजरा आपल्याकडे वळवण्यात बाजी मारून गेली. रणबीरच्या मेहेंदी सोहळ्यात रिद्धिना कपूरनं सिल्व्हर रंगाची साडी नेसली होती ज्याची किंमत लाखांमध्ये होती.

भाऊ रणबीर कपूरच्या मेहेंदी सोहळ्यासाठी रिद्धिमानं सिल्व्हर रंगाची शिमर साडी नेसली होती. ज्यावर शोभून दिसेल असा शिमरी स्लीव्हलेस ब्लाऊज तिनं घातला होता. भावाच्या मेहेंदीसाठी रिद्धिमानं मनिष मल्होत्रानं डिझाइन केलेला आऊटफिट घालण्यास पसंती दिली होती. या साडीची किंमत जवळपास १ लाख ५५ हजार इतकी होती. आपल्या शिमर ग्रे साडी सोबत रिद्धिमा सहानीनं आपल्या मोकळ्या केसांना सोडून सिंपल हेअरस्टाईल ठेवली असली तरी गळ्यात,कानांत घातलेल्या हेवी ज्वेलरीनं तिच्या लूकला स्पेशल टच दिला होता. तिच्या या स्टायलिश लूकला खूप पसंतही केलं गेलं.

रिद्धिमानं आपल्या भावाच्या लग्नाच्या आधी पार पडेल्या सोहोळ्यातील फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं होतं,'' भाई की शादी''. चाहत्यांना रिद्धिमाचे फोटो आणि तिचा ग्लॅमरस अंदाज खूप पसंत येतोय. एका नेटकऱ्यानं त्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे,'' तु खूप स्टनिंग दिसतेयस'', तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ''खूप सुंदर दिसतेयस. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा''.

रणबीर-आलियाचं लग्नाच्या आधीचे सर्वच सोहळे खूप धामधूमीत पार पडले. संगीत,मेहेंदी,हळद सगळे पार पडलेयत,इतकंच काय आज दुपारी ३.३० च्या मुहूर्तावर दोघे लग्नबंधनातही अडकले आहेत असं बोललं जात आहे. आणि विशेष म्हणजे बातमी आहे की रात्री साधारण साडे सात-आठच्या सुमारास हे दोघे मीडिया कॅमेऱ्या समोर येऊन सर्व चाहत्यांच्या शुभेच्छाही त्या माध्यमातून स्विकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Updates : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT