Riteish Deshmukh shares tiktok video on Twitter  
मनोरंजन

रितेश जेनेलियाला म्हणाला 'मैं किसी और से प्यार करता हूँ...' अन् मग काय!

सकाळ डिजिटल टीम

सध्या रितेश आणि जेनेलियाचे टिकटोक व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करत आहेत. कालच जेनेलियाने शेअर केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. तसेच काल लग्नाच्या वाढदिवशीही रितेशने जेनेलियाला टिकटॉक व्हिडिओ शेअर करूनच शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच आज रितेशचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होतोय. रितेशने ट्विटरवर त्याचा आणि जेनेलियाचा एक हटके व्हिडिओ शेअर केलाय आणि त्याला कॅप्शन दिलंय की, 'घरी हा स्टंट करू नका! धोकादायक आहे!'

रितेशने जो टिकटॉक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात जेनेलिया त्याला म्हणते की, 'बेबी आय लव्ह यू सो मच...' यावर रितेश म्हणतो की, 'पर मै किसी और से प्यार करतो हूं' यावर जेनेलिया म्हणते की, 'क्या बोला?' यावर रितेश गोंधळतो आणि म्हणतो की, 'बेबी आपकी स्माईल से...' यावर जेनेलिया हासते. तर रितेश हळूच म्हणतो की, 'मौत को छुके टक से वापस आ सकतो हूँ' हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट होतोय. या व्हिडिओला कॅप्शन दिलंय की, 'घरी हा स्टंट करू नका! धोकादायक आहे!'

सध्या रितेश आणि जेनेलिया दोघंही टिकटॉक अॅडिक्ट झाल्याचं बघायला मिळतंय. दोघं सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतात आणि सारखे मजेशीर व्हिडिओ पोस्ट करतात. 

जेनेलियाने काल एक शेअर केला होता, तो व्हिडिओ मराठीत होता. ज्यामध्ये गॉगल लावलेली जेनेलिया दबंगपेक्षा लेडीपेक्षा कमी दिसत नाहीये. या व्हिडिओमध्ये मुलांना निशाणा साधणारी एक मजेशीर ओळ आहे. ज्यात जेनेलिया म्हणते, 'तुझ्या घरात चार दिवस लाइट नाही ते पाहीना. अरे जेवढे कावळे काव काव करीत नाहीत, जेवढे पोरं पोरींच्या कमेंटवर वाह वाह करतात''. 

तर कालच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रितेशने व्हिडिओ शेअर केला होता. त्यात जेनेलिया त्याला लग्नाचे फोटो दाखवतीये आणि बॅग्राऊंडला गाणं वाजतंय की, 'जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्यो उन्हे छेडे जा रहें हो' हे गाणं आणि रितेशचे एक्स्प्रेशन अगदी बघण्यासारखे आहेत. जगजीत सिंह यांच्या तुम इतना क्यो मुस्कुरा रहें हो या गण्याने या व्हिडिओला मजा आणली आहे.

या व्हिडिओला त्याने 'हॅप्पी अॅनिव्हर्सरी बायको' असं कॅप्शन दिलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT