shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16
shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16 SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 16: नशीब चमकलं..! बिग बॉस नंतर रोहित शेट्टी Shiv Thakare ला खतरो के खिलाडी साठी घेऊन जाणार

Devendra Jadhav

Bigg Boss 16 Grand Finale: बिग बॉस १६ आता अखेरच्या टप्प्यावर आलंय. उद्या म्हणजेच १२ फेब्रुवारीला बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले आहे. शिव ठाकरे, एम. सी. स्टॅन, प्रियंका चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे ५ जण फायनलचे मुख्य दावेदार आहे.

ग्रँड फिनालेआधी एक मोठी घोषणा होणार आहे. बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टीची दमदार एंट्री होणार आहे.

रोहित शेट्टी काच फोडून बिग बॉसच्या घरात एंट्री करणार आहे. रोहित शेट्टीच्या एंट्रीने सर्व सदस्यांना आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसलाय. रोहित शेट्टी सदस्यांकडून खतरो के खिलाडी संबंधित काही टास्क खेळवणार आहे.

यावेळी रोहित खतरो के खिलाडी च्या आगामी सिझनचं प्रमोशन करणार आहे. खतरो के खिलाडीचा आगामी १३ वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे या नव्या सीझनसाठी रोहित शेट्टी शिव ठाकरेची निवड करणार आहे.

बिग बॉसचे सोशल मीडियावर जे फॅन पेजेस आहेत त्यावर एकच चर्चा आहे. ती म्हणजे रोहित शेट्टी बिग बॉस नंतर शिव ठाकरेला खतरो के खिलाडी साठी घेऊन जाणार आहे.

मागच्या सिझनला रोहित शेट्टीने याच पद्धतीने बिग बॉस मधल्या तेजस्वी प्रकाशला खतरो के खिलाडी साठी निवडलं होतं. पुढे तेजस्वीने बिग बॉस १५ चं विजेतेपद पटकावलं.

अशाप्रकारे शिव ठाकरेची सुद्धा खतरो के खिलाडी साठी निवड झाल्यांनतर शिवने सुद्धा बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर नाव कोरलं तर हा एक विलक्षण योगायोग असेल. आता १२ फेब्रुवारीला हे सर्व चित्र स्पष्ट होईल.

बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले १२ फेब्रुवारीला कलर्स वर बघायला मिळेल. शिव आणि प्रियंका या दोघांमध्ये फायनलची चुरस बघायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आहे. सलमान खानच्या उपस्थितीत बिग बॉस १६ ग्रँड फिनाले आलिशान पद्धतीने रंगणार आहे.

आता टॉप ५ सदस्यांपैकी बिग बॉस १६ ची ट्रॉफी शिव ठाकरे जिंकणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT