SS Rajamouli esakal
मनोरंजन

SS Rajamouli : अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांची राजामौलींना मोठी ऑफर, 'तुम्ही आता...'

जगभरामध्ये सध्या टॉलीवूडच्या आरआरआऱची मोठी हवा आहे. या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं गोल्डन गोल्ब पुरस्कार मिळवणारं ठरलं.

सकाळ डिजिटल टीम

RRR Director SS Rajamouli Avatar Director James Cameron praised : जगभरामध्ये सध्या टॉलीवूडच्या आरआरआऱची मोठी हवा आहे. या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं गोल्डन गोल्ब पुरस्कार मिळवणारं ठरलं. आता अपेक्षा आणि प्रतिक्षा ऑस्कर पुरस्कार मिळवण्याची असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी आरआऱआऱचे दिग्दर्शक राजामौलींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आता राजामौलींचा आरआरआऱ हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण जगप्रसिद्ध चित्रपट अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी राजामौलींचं कौतूक केले आहे. त्यांच्या चित्रपटाबद्दल त्यांना काय वाटले हेही आवर्जुन सांगितले आहे. हे करताना त्यांनी राजामौलींना एक भन्नाट ऑफरही दिली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'या चित्रपटाने सध्या जागतिक स्तरावर मोठं नाव झालं आहे. सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपटांपैकी एक आरआऱआऱ अशी त्याची ओळख झाली आहे. दरम्यान, आता या चित्रपटाने हॉलिवूड चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरून यांचेही लक्ष वेधून घेतले, ज्यांनी एसएस राजामौली यांच्याशी संवाद साधत त्यांचे व्हिजन, त्यांची प्रतिभावान स्टोरीटेलिंग आणि त्यांच्या इमोशन्सने भरपूर असलेल्या पात्रांची प्रशंसा केली.

एसएस राजामौली यांच्याशी झालेल्या संभाषणात जेम्स कॅमेरून म्हणाले, "तुमची पात्रे पाहणे ही एक वेगळी अनुभूती आहे. मला ही गोष्ट आवडली की तुम्ही सर्व गोष्टी एकत्र दाखवल्या, हा एक परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट आहे. आणि मला तो आवडला. तुमचा देश आणि तुमच्या प्रेक्षकांना किती अभिमान वाटतो याची मी फक्त कल्पना करू शकतो. तुम्हाला टॉप ऑफ द वर्ल्ड ची भावना वाटली पाहिजे."

चित्रपटाबद्दल बोलण्याव्यतिरिक्त, कॅमेरूनच्या पत्नी यांनी खुलासा केला की, त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा पाहिला, 'अवतार' आणि 'टायटॅनिक'च्या दिग्दर्शकाने एसएस राजामौली यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्याचे आमंत्रणही दिले. तसेच, तुम्हाला कधी इथे चित्रपट बनवायचा असेल तर लेट्स टॉक." आपण कधीही बोलू शकतो.... या ट्विटनंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

जागतिक बॉक्स ऑफिसवर बाराशे कोटींची कमाई करणारा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट बनण्याव्यतिरिक्त, एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'या सिनेमाने 'बेस्ट ओरिजनल सॉंग'साठी भारतातील पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कारही पटकावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT