RRR Movie-OTT Date release Google
मनोरंजन

'RRR' हिंदीत 'OTT' वर पाहू इच्छिणारे प्रेक्षक आता नाराज होण्याची चिन्ह

'RRR' लवकरच प्रादेशिक भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या बातमीनंतर चाहत्यांमध्ये भलताच उत्साह पहायला मिळाल होता.

प्रणाली मोरे

ज्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर राजामौलींचा 'RRR' पाहता आला नाही त्यांची सिनेमा पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. एस.एस.राजामौली यांच्या RRR सिनेमानं बॉक्सऑफिसवर आपली जादू कायम ठेवलेली आहे. जगभरात या सिनेमानं बॉक्सऑफिसवर ८०० कोटींची कमाई केली आहे. ज्युनिअर एनटीआर(Jr.NTR),रामचरण(Ramcharan),आलिया भट्ट(Alia Bhatt),अजय देवगण(AJay Devgan) अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे आणि त्या सर्वांनीच आपल्या अभिनयाची चांगलीच जादू चाहत्यांवर केली आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा हाऊसफुल्ल झालेला दिसला. जे प्रेक्षकवर्ग सिनेमाला मोठ्या पडद्यावर पाहू शकले नाहीत ते मात्र सिनेमा ओटीटीवर केव्हा प्रदर्शित होणार याची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण आता त्या साऱ्यांसाठी मोठी गूडन्यूज आलेली आहे,ज्यामुळे त्यांच्या मनातली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

हो.हे खरंय. लवकरच 'RRR' एकाच नाही तर चक्क दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा प्रादेशिक भाषांमध्ये Zee5 वर पाहता येणार आहे. प्रदर्शनानंतर दोन महिन्यात सिनेमा Zee5 वर येईल. म्हणजेच २५ मे ला ओटीटीवर हिंदी सोडून इतर सर्व प्रादेशिक भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. तर हिंदी भाषेत मात्र हा सिनेमा अद्याप प्रदर्शित होणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी मात्र ही नाराज करणारी बातमी आहे.

'RRR' सिनेमाच्या निर्मात्यांनी अल्लु अर्जूनच्या 'पुष्पा द राइज'वरनं हा सिनेमा हिंदी भाषेत ओटीटीवर लवकर प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण 'RRR' सिनेमाचं हिंदी व्हर्जन अद्याप थिएटरमध्ये चांगलं सुरु आहे. सिनेमानं २०० करोडचा व्यवसाय केलेला आहे. म्हणून इतक्या लवकर हिंदीत हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करुन कोणतीही रिस्क निर्मात्यांना घ्यायची नाही. बातमी आहे की, RRR चं हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केलं जाऊ शकतं. पण सिनेमाच्या मूळ प्रदर्शनानंतर तब्बल ३ महिन्यांनी ओटीटीवर हिंदी भाषेत तो प्रदर्शित होईल आणि प्रदर्शनाची तारिख असेल २५ जून. पण अद्याप जर-तर मध्ये ही तारिख अडकली आहे. RRR सिनेमातील VFX प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस उतरत आहे. सिनेमानं प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसचे सगळेच रेकॉर्ड तोडलेले पहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT