Prajakta Mali, Prajakta Mali news, Prajakta Mali photos, Prajakta Mali boyfriend, Prajakta Mali affiar SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ता माळी साठी हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामींनी घेतला मोठा निर्णय

प्राजक्तासाठी लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मोठा निर्णय घेतलाय.

Devendra Jadhav

Prajakta Mali News: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेली सगळ्यांची लाडकी प्राजु म्हणजे प्राजक्ता माळी.

प्राजक्ता वाह दादा वाह म्हणत तिच्या खुमासदार शैलीत महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे निवेदन करत असते.

प्राजक्ता माळी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली ती म्हणजे.. प्राजक्तराज. प्राजक्तराजच्या माध्यमातून प्राजक्ता माळीने अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचं कलेक्शन सर्वांसमोर आणलं आहे.

याच प्राजक्तासाठी महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मोठा निर्णय घेतलाय.

(Sachin Goswami from maharashtrachi hasyajatra took a big decision for marathi actress Prajakta Mali)

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. यात प्राजक्तासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते - दिग्दर्शक सचिन गोस्वामी दिसत आहेत. प्राजक्ता सचिन गोस्वामींना तिच्या दागिन्यांचं दाखवत असते.

सचिन गोस्वामी सुद्धा कुतूहलाने प्राजक्तराजचे दागिने बघत असतात. प्राजक्ता तू आदर्श आहेस.. हे दागिने मराठी परंपरेतून हरवत चालले होते.

अशा अलंकरांना तू सर्वांसमोर आणलं आहेस.. अशा शब्दात गोस्वामींनी प्राजक्ताचं कौतुक केलं

याशिवाय सचिन गोस्वामींनी प्राजक्ताला एक महत्वाचा निर्णय सांगितला. प्राजक्ताने स्वतः खुलासा केलाय. प्राजक्ता लिहिते..

हास्यजत्रेमध्ये आमच्या कलाकारांनी मराठी अलंकार वापरावेत म्हणून आमच्या प्रॅाडक्शन हाऊसलाच “प्राजक्तराज” चं ‘सोनसळा’ कलेक्शन भेट दिलं.

तेव्हा सरांनी एक कल्पना सुचवली की असा एकत्रित दागिन्यांचा बॅाक्सच का नाही आणत? जेणेकरून लोकांना भेट म्हणून द्यायला; स्वतःलाही वापरायला संपूर्ण सेट राहील.."

अशी पोस्ट लिहून सचिन गोस्वामींनी सुचवलेला सल्ला लक्षात घेत प्राजक्ता अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर प्राजक्तराजचं नवीन कलेक्शन समोर आणणार असल्याचं समजतंय.

प्राजक्ता माळीने काहीच महिन्यांपूर्वी अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या प्राजक्तराज या तिच्या नवीन वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT