Sai Pallavi is also a fan of Bollywood, said – Instagram
मनोरंजन

ऐश्वर्या,दीपिकाचं नाव घेत साई पल्लवीनं बॉलीवूड विषयी केलेलं वक्तव्य चर्चेत

साई पल्लवीची गणना साऊथ मधील गुणी आणि उत्तम अभिनेत्रींमध्ये केली जाते.

प्रणाली मोरे

तामिळ सिनेमांची सुपरस्टार साई पल्लवीने(Sai Pallavi) ऐतिहासिक सिनेमांतून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिनं म्हटलं आहे की, पद्मावत,बाजीराव मस्तानी सारख्या सुपरहिट बॉलीवूड (Bollywood) सिनेमातील भूमिकांसारख्या व्यक्तिरेखा तिला साकारायच्या आहेत. साई असंही म्हणाली आहे की तिला तेलुगूतला पीरियड सिनेमा 'श्याम सिंग रॉय' मध्ये रोजी आणि मैत्रेयी सारख्या भूमिका साकारुन खूप समाधान मिळालं.(Sai Pallavi is also a fan of Bollywood, said )

साई पल्लवीचा सिनेमा 'श्याम सिंग रॉय' १९७० काळातला सिनेमा आहे. कोलकातामधील त्या काळातल्या बांग्लादेशीय देवदासीची भूमिका तिने साकारली होती. यासंदर्भात एका मुलाखतीत साई पल्लवी म्हणाली आहे की,''मी कधी कधी काही सिनेमांतील भूमिकांमध्ये स्वतःला इमॅजिन करते. त्या भूमिका पाहिल्यावर मला वाटतं,हा रोल मला मिळाला असता तर. मी 'पद्मावत' आणि 'बाजीराव मस्तानी' पाहिला आहे. मला वाटतं की जेव्हा मी अशा ऐतिहासिक भूमिका साकारते तेव्हा माझ्या मनाला खूप आनंद मिळतो. जर मला अशी एखादी भूमिका मिळाली तर मी खरंच खूप खूश होईन''.

साई पल्लवी जरी साऊथ इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री असली तरी तिची क्रेझ मात्र बॉलीवूडच्या चाहत्यांमध्येही पहायला मिळते. त्यामुळे तिच्याविषयी,तिच्या सिनेमांविषयी जाणून घ्यायला सगळीकडचाच सिनेमांचा चाहता वर्ग उत्सुक असतो. साईचा 'गार्गी' सिनेमा १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला प्रदर्शनाआधीच खूप प्रशंसा वाट्याला येतेय. या सिनेमातील साई पल्लवीच्या अभिनयाचं खूप कौतूकही केलं जात आहे. याआधी साई पल्लवी 'वीरता पर्वम' मध्ये राणा दुग्गुबाती सोबत दिसली आहे. हा सिनेमा तेलंगणा मधील नक्षलवादाच्या आंदोलनावर आधारित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

SCROLL FOR NEXT