sairat movie completed 6 years today sakal
मनोरंजन

इतिहास घडवणाऱ्या 'सैराट'ला आज सहा वर्षे पूर्ण झाली.. रिंकूनं सांगितली आठवण..

मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारा 'सैराट' चित्रपट २९ एप्रिल २०१६ मध्ये रिलीज झाला होता. आज या चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्या निमित्ताने ही आठवण..

नीलेश अडसूळ

दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी मराठी चित्रपट विश्वात क्रांती घडवून आणली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कोण कुठला नागराज मंजुळे येतो आणि मराठी चित्रपटाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो अशी अवस्था त्यांनी केलेल्या चित्रपटाने झाली. एका विशिष्ट धाटणीच्या, ठराविक कलाकरांना घेऊन केल्या जाणाऱ्या चोकोरीबध्द सिनेमाची चौकट मोडून त्यांनी 'पिस्तुल्या' आणला, मग 'फॅन्ड्री' आणि मग 'सैराट'...

समाजातील अंधारात असलेल्या घटकांना, विषयांना प्रकाशात आणण्याचा जाणून विडाच नागराज (nagraj manjule) यांनी उचलला आहे. नुकताच त्यांचा 'झुंड' हा चित्रपट घेऊन गेला. या चित्रपटाद्वारेही त्यांनी झोपडपट्टीतील मुलं काय करू शकतात याचं दर्शन घडवलं. पण नागराज यांच्या यशाची खरी जर्नी सैराट पासून सुरु झाली. कारण या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडून नवा इतिहास घडवला, केवळ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले नाही तर १०० कोटींचा टप्पाही पार केला. १०० कोटी पार करणारा 'सैराट' हा पहिला मराठी चित्रपट ठरला.

सैराट २९ एप्रिल २०१६ (sairat) ला रिलीज झाला. आज या चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली असून आपली सर्वांची लाडकी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूने (rinku rajguru) याचे स्मरण करून दिले आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर (akash thosar) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आर्ची आणि परशा अशी त्यांची जोडी आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. ग्रामीण भागातील सरंजामशाही, जातीय तेढ आणि आंतरजातीय विवाहातील संघर्ष आणि अचूक आणि मार्मिकपणे या चित्रपटाने मांडला.

rinku rajguru shares sairat movie memory

या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. कारण रिंकूने आज सैराटला ६ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगताच चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पडला. रिंकूने चित्रपटातील एका सिनमधील फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रिंकू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंड, अरबाज शेख दिसत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या चित्रपटानं त्यावेळी ११० कोटींची कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update : भाजपकडून २६ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

SCROLL FOR NEXT