Sakshi Tanwar Instagram
मनोरंजन

Sakshi Tanwar आणि राम कपूरचा १७ मिनिटांचा इंटिमेट सीन आजही चर्चेत; शूटच्या वेळेस अभिनेत्रीनं अनेकदा...

मालिका विश्वातील फेव्हरेट सून म्हणून प्रसिद्ध असलेली साक्षी तन्वर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रणाली मोरे

Sakshi Tanwar Birthday: छोट्या पडद्यावरचं प्रसिद्ध नाव म्हणजे साक्षी तन्वर. मालिका विश्वात तिचं नाव म्हणजे एक ब्रॅन्ड बनलं आहे. दूरदर्शन वाहिनीवरनं सुरु झालेला तिचा प्रवास केव्हा स्टार प्लस, सोनी अशा बड्या वाहिन्या आणि ओटीटी पर्यंत पोहोचला तिलाही कळलं नसेल बहुधा इतका तो जलद आणि सुंदर घडला.

यादरम्यान लोकांनी साक्षीच्या रिलेशन,डेटिंगच्या बातम्यांवरनं खूप चर्चा केली पण साक्षीनं ना तेव्हा त्या बातम्यांना मनावर घेतलं ना आता ती त्यांच्याकडे लक्ष देते. 'बडे अच्छे लगते है' या मालिकेनंतर तिचे नाव कायम राम कपूरसोबत जोडले गेले,याची एक कहाणी आहे. आज आपण ती जाणून घेणार आहोत.(Sakshi Tanwar And Ram Kapoor Bold Intimate scene,kissing scene)

साक्षी तन्वरनं तब्बल ८ वर्ष 'कहानी घर घर की' मालिकेत काम केलं. तेव्हाच एकतानं तिला सांगितलं होतं की तुला घेऊन मला आणखी एक मालिका करण्याचा विचार मनात आहे. पण सलग ८ वर्ष मालिकेत काम केल्यानंतर साक्षी एवढी थकली होती की तिनं अडीच वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. त्याचवेळी राम कपूर आणि साक्षीच्या जोडीला एकत्र मालिकेत आणायचं हा विचार एकतानं मात्र आपल्या डोक्यात फिट केला होता.

साक्षी एकदा म्हणाली होती, ''राम कपूर 'कसम से' मालिकेचं शूटिंग करत होता तेव्हा ती कहानी घर घर की मध्ये काम करत होती. त्यांचे दोघांचे सेट खूप जवळ होते.आणि अनेकदा आम्ही एकमेकांसमोरुन जायचो पण तेव्हा वाटलं नव्हतं आम्ही कधी एकत्र काम करू''. २०११ मध्ये जेव्हा ब्रेक संपला तेव्हा एकतानं साक्षीला त्या नवीन शो विषयी माहिती दिली.

साक्षी तन्वर मात्र राम कपूर सोबत आपली जोडी कशी दिसेल याविषयी थोडी साशंक होती. मालिकेचा पहिला प्रोमो देखील वेगवेगळा शूट केला गेला होता..पण जसं 'बडे अच्छे लगते है' मालिकेचं शूटिंग सुरू झालं तेव्हा एकदा देखील तिला जाणवलं नाही की ती पहिल्यांदा राम कपूर सोबत काम करत आहे. दोघांमधली केमिस्ट्री आणि एकमेकांना समजून घेण्याची पद्धत इतकी कमाल होती की पुढे लोकांना वाटू लागलं की साक्षी आणि राम कपूर मध्ये अफेअर सुरु आहे.

'बडे अच्छे लगते है' मालिकेत राम कपूर सोबत साक्षीनं बोल्ड इंटिमेट सीन दिल्यानं टी.व्ही क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. दोघांनी ऑनस्क्रीन १७ मिनिटांचा इंटिमेट सीन शूट केला होता.

तो सीन शूट करताना अनेकादा शूटिंग थांबवण्यात आलं होतं. साक्षीनंच याविषयी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. साक्षीला शूटिंग दरम्यान अनेकादा अस्वस्थ वाटायला लागल्यानं हा सीन शूट करताना बराच वेळ देखील लागला होता.

मालिकेतील संस्कारी सूनेचा तो बोल्ड सीन पाहून सगळेच शॉक झाले होते. कारण या पद्धतीनं साक्षी तन्वर रोमान्स करेला याची कल्पना कोणीच केली नव्हती. राम कपूर आणि साक्षीवर चित्रित केल्या गेलेल्या त्या किसिंग सीनची आजही खूप चर्चा रंगताना दिसते.

साक्षी तन्वरला खूप ट्रोल केलं गेलं होतं. कदाचित हे पहिल्यांदा घडत होतं जेव्हा एखाद्या टी.व्ही अभिनेत्रीनं किसिंग सीन दिला होता. साक्षीचा तो इंटिमेट सीन खूप व्हायरल झाला होता. एखाद्या कौटुंबिक मालिकेत अशा प्रकारचा सीन दाखवला गेल्यामुळे लोकांनी खूप नावं देखील ठेवली.

शेवटी एकता कपूरला माफी मागणं भाग पडलं होतं. अशा प्रकारचा किसिंग सीन दिल्यानंतर साक्षी तन्वरची इमेज रातोरात बदलली. पडद्यावर राम कपूर आणि साक्षी तन्वरची जोडी सुपरहिट ठरली.

साक्षी आज पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे. पण अभिनेत्री आजही सिंगल आहे आणि लग्नाच्या बंधनात तिला स्वतःला बांधून घ्यायचं नाही. लग्न या संकल्पनेलाच तिची नकारघंटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT