Saleel Kulkarni Instagram
मनोरंजन

''अखेर काश्मिरचं सत्य जगासमोर आलंच''... सलील कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

'द काश्मिर फाईल्स' सिनेमा ११ मार्च,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

प्रणाली मोरे

विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) हा सिनेमा अनेक संकटांचा ,वादग्रस्त गोष्टींचा सामना करत अखेर ११ मार्च,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. १९९० सालात काश्मिरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर हा सिनेमा भाष्य करतो. त्यावेळी अनेक काश्मिरी पंडितांना आपल्या भूमीतून जीव मूठीत घेऊन पळ काढावा लागला होता,त्यावेळचा जीवघेणा संघर्ष,त्यामागचं खरं सत्य नेमकं काय या साऱ्याचं चित्रण 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमातून करण्यात आलं आहे. या सिनेमावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यातलीच एक सेलिब्रिटी प्रतिक्रिया इथे आवर्जुन सांगावीशी वाटते ती आहे संगीतकार डॉ.सलील कुलकर्णीची. काय म्हणाला आहे सलील 'काश्मिर द फाईल्स' या सिनेमाविषयी.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमात अनुपम खेर(Anupam Kher),पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,पुनीत ईस्सर,दर्शन कुमार,मृणाल कुलकर्णी असे कलाकार आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी विवेक अग्निहोत्री यांना सोशल मीडियावरनं धमकी देण्यात आली होती. पण त्या धमकीला न जुमानता अखेर सिनेमा प्रदर्शित केला गेला. सिनेमा पाहिल्यानंतर अनेक सिनेमागृहातले व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की सिनेमा पाहून प्रेक्षक अक्षरशः रडत आहेत. आता संगीताकार सलील कुलकर्णीनंही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाची प्रशंसा करताना पोस्ट लिहिली आहे.

सलील कुलकर्णीनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''टूटे हुए लोग बोलते नहीं है...उन्हें सुनना पड़ता है ...!! What an experience by Vivek Agnihotri and Pallavi Joshi .
After studying 7000 true stories of Kashmiri Pandits ...They have come up with something so true...so genuine ...!!
" जब तक सच जूते पहने ..झूठ दुनियाभर घुमके आता है "What an attempt to convey the " सच " of Kashmir !!'' अशी एकंदरीत ती पोस्ट आहे. सलीलनं सिनेमातील सत्य कथानकाचं कौतूक करताना दिग्दर्शक आणि कलाकारांच्या धाडसाचंही कौतूक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT