Salman Khan
Salman Khan  
मनोरंजन

Salman Khan : 'मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित'!, भाईजान असं का म्हणाला?

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Salman Khan Interview Dubai Safe compare : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्याच्या घराभोवती मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही आहे. सलमाननं देखील आता यासगळ्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमानचा किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होती. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांना कुतूहल होते. मात्र त्या चित्रपटानं चाहत्यांची निराशा केल्याचे दिसून आले. दरम्यान सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यासगळ्यात सलमानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सलमानला धमकी देण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर सलमाननं पहिली जी प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये त्यानं धमकी देणाऱ्या लॉरेन्सला आपण ओळखत नसल्याचे सांगितले होते. आता मला जिकडे जायचं असेल तिथे पोलिसांचे संरक्षण सोबत घेऊन जावे लागत आहे. मला त्याची काहीही गरज नाही. मात्र प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. यानंतर सलमाननं पुन्हा एका मुलाखतीमध्ये जी प्रतिक्रिया दिली त्याची चर्चा होत आहे.

सलमाननं यावेळी भारत आणि दुबईमधील त्याच्या सुरक्षेविषयी मत प्रदर्शन केलं आहे. तो म्हणतो आता मला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं मला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून येते आहे. मला जे काही करायला सांगण्यात आले आहे ते मी अतिशय सावधानपूर्वक करतो आहे. खूप काळजी घेतो आहे.

मुंबई पोलिसांकडून सलमानला वाय दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. आप की अदालत नावाच्या कार्यक्रमामध्ये सलमाननं जे मतप्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यानं आता आपल्याला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटत आहे. असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT