Salman Khan Reaction On Jawan Prevue Esakal
मनोरंजन

Salman Khan: भाईजानला लईच आवडला शाहरुखचा 'जवान'! म्हणाला, 'आता तर मी'

Vaishali Patil

Salman Khan Reaction On Jawan Prevue: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज करण्यात आला. हे पाहिल्यानंतर शाहरुखचे चाहते सोशल मीडियावर खुप आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

सोशल मिडियावर फक्त शाहरुखचीच चर्चा आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहे. त्याचबरोबर आता त्यांना या चित्रपटाच्या रिलिजची उत्सुकता लागली आहे.

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आधी 2 जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अनेक चाहत्यांनी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या प्रिव्ह्यू रिलीजनंतर प्रतिक्रिया दिली आता यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सामावेश झाला आहे. जवान चा प्रिव्हू पाहिल्यानंतर आता सलमानही स्वत:ला रोखू प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकलेला नाही.

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाबाबत सलमान खानने सोशल मीडियावर कोणती पोस्ट केली आहे. सलमान खानने मंगळवारी इंस्टाग्रामवर शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला.

हा व्हिडिओ शेयर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''पठाण जवान बन गया', उत्कृष्ट ट्रेलर. खूप आवडला. आता हा असा एक चित्रपट आहे जो आपण फक्त थिएटरमध्येच पाहिला पाहिजे. मला तर याची खात्री आहे की मी तो पहिल्या दिवशी बघेन. मजा आली..वाह….'

या सोबतच त्याने शाहरुखला टॅग केलं आहे. त्यानंतर दोघही खानच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. सध्या सलमानची ही पोस्ट चर्चेच कारणं बनली आहे.

'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शिन अॅटली कुमारने केले आहे, जो 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि अॅटली कुमार , नयनतारा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

'जवान' चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा व्यतिरिक्त योगी बाबू, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार दिसणार आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT