Samantha Ruth Prabhu esakal
मनोरंजन

Samantha: 'कर्मण्येवाधिकारस्ते..', करिअर संपल म्हणणाऱ्या निर्मात्याच्या टोमण्याला सांमथानं दिलं कडक उत्तर...

Vaishali Patil

साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. कही दिवसांपुर्वीच हा चित्रपट रिलिज झाला. हा सामंथाचा हा मोस्ट अवेडेड चित्रपट होता. सांमथाही या चित्रपटासाठी खूप उत्सुक होती.

मात्र 'शाकुंतलम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. तो सामंथाच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादित सहभागी झाला. मात्र या चित्रपटातील सामंथाच्या अभिनयाचं सर्वांनीच तोंड भरुन कौतुक केलं.

दरम्यान तेलगू चित्रपट निर्माता चिट्टी बाबूने मात्र सामंथावर टीका केली. इतकच नाही तर तिची अभिनेत्री म्हणून कारकीर्दच संपली आहे आणि ती पुन्हा कधीही स्टारडममध्ये परत येणार नाही असा दावा केला. त्याच्या या वक्तव्याची सोशल मिडियावर खुपच चर्चा झाली.

त्याच झालं असं की चिट्टी बाबूने एका मुलाखतीत सांगितलं की, "समंथाने घटस्फोटानंतर पुष्पा द राइजमध्ये ओ अंटवा हे आयटम साँग केले होते. स्टार अभिनेत्रीचे स्थान गमावल्यानंतर, तिला ते करायचे नव्हतं. काहीही." ऑफर्स येत आहेत आणि ती ती करत आहे. एक अभिनेत्री म्हणून तिची कारकीर्द संपली आहे आणि ती पुन्हा स्टारडममध्ये येऊ शकत नाही. तिला जे काही ऑफर मिळेल ते करत तिने आपला प्रवास सुरू ठेवला पाहिजे."

आता त्याच्या या टोमण्याला सामंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

कारमध्ये बसलेले स्वत:चे फोटो शेअर करत तिने लिहिले, "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ."

श्लोकाचा अनुवाद म्हणजे तुमच्या कर्मावर तुमचा अधिकार आहे, परंतु त्याच्या बदल्याक कोणत्याही फळाची अपेक्षा कधीही ठेवू नका . तुमच्या कर्माच्या फळाने तुम्ही कधीही प्रवृत्त होऊ नयेत किंवा तुमच्या विहित केलेली कामे न करण्याची आसक्ती असू नये.'

सामंथाच्या वर्क फ्रंटवर बद्दल बोलायचं झालं तर, ती पुढे विजय देवरकोंडा सोबत 'खुशी' चित्रपटात दिसणार आहे. रुसो ब्रदर्सच्या सिटाडेलचा हिंदी रिमेकमध्येही ती अभिनेता वरुण धवनही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT