Sambhavana Seth On IVF treatment And Baby planning Google
मनोरंजन

IVF ट्रीटमेंटविषयी अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली,'बाळ हवंय पण म्हणून...'

गेल्या अनेक वर्षांपासून संभावना बाळाचं प्लॅनिंग करत आहे. तिनं IVF ट्रीटमेंटही घेतली होती, पण त्यानंतर तिनं आता एक मोठा निर्णय घेत काही खुलासे केलेयत.

प्रणाली मोरे

IVF Treatment: भोजपूरी सिनेमा आणि टि.व्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठ(Sambhavana Seth) स्वतः एक युट्यूबर ब्लॉगर देखील आहे. संभावना आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते. संभावना आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तिचं ब्लॉग प्रेम जबरी आहे,ते करणं,चाहत्यांना अपडेट ठेवणं ती काही सोडत नाही. ती प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून संभावना बाळाचं प्लॅनिंग करत आहे,तिला बाळ हवंय पण त्याला यश मिळत नाहीय. खूप प्रयत्न केल्यानंतरही ती प्रेग्नेंट राहू शकत नाही म्हणून तिनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे.(Sambhavana Seth On IVF treatment And Baby planning)

संभावना सेठ आणि अविनाश द्वीवेदी यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. लग्नानंतर दोघांनाही लगेच बाळ नको हवं होतं. पण कुटुंबाकडूनही जेव्हा सारखी विचारणा केली जाऊ लागली तेव्हा त्यांनी बाळाचं प्लॅनिंग करायचं ठरवलं. पण त्याला यश मिळेना आणि त्यासाठी संभावनाला खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. त्यानंतर संभावना आणि तिच्या पतीनं IVF ट्रीटमेंटच्या सहाय्यानं बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. पण हा प्रवासही सोपा नव्हता असं अभिनेत्री म्हणाली.

IVF ट्रीटमेंटच्या दरम्यान संभावनाला खूप शारिरीक त्रासातून जावं लागलं आहे. या ट्रीटमेंटच्या रिझल्टविषयी बोलताना संभावना म्हणाली,'' या ट्रीटमेंट संबंधित जेव्हा मला चाहत्यांकडून विचारणा झाली तेव्हा त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी दिली''. ती पुढे सांगते, ''माझी IVF ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे. पण यापुढची मुख्य प्रक्रिया कधी सुरु होणार हे माझ्या आरोग्यावर अवलंबून आहे. कारण यावेळी माझ्या आरोग्याशिवाय कोणतीच गोष्ट जास्त मह्त्त्वाची नाही''.

संभावना पुढे म्हणते की IVF ट्रीटमेंट दरम्यान मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मला खूप त्रासही सहन करावा लागला. जसं माझ्या गुडघ्यांमध्ये खूप दुखायचं. वजन झपाट्यानं वाढू लागलं. याव्यतिरिक्त काही अशा गोष्टी आहेत,ज्या मी शेअर करू शकत नाही ज्यांचा त्रास मला या ट्रीटमेंट दरम्यान झाला''. हेच कारण आहे की संभावना आता बाळाच्या आधी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देतेय. अभिनेत्री म्हणाली, ''पुढे या ट्रीटमेंटशी संबंधित जे माझ्यासोबत घडेल मी शेअर करेन चाहत्यांसोबत. सध्यातरी मी बाळाचा विचार सोडून देऊन स्वतःवर लक्ष केंद्रित केलं आहे. माझी काळजी घेतेय''.

संभावना म्हणाली,''आपल्या प्रत्येकाला बाळाची इच्छा असते,पण त्यासाठी आपण आपल्या जीवाला धोक्यात नाही टाकू शकत. मला मुल हवंय पण असं नाही. मी स्वतःच अशक्त असेन तर मी बाळ झाल्यावर त्याची काळजी कशी घेऊ शकेन. मी प्रथम स्वतःला सशक्त बनवेन आणि मग सुदृढ बाळाचा विचार करेन''.

संभावनाने इतकं देखील म्हटलं की, मला मुल जेव्हा होणार असेल तेव्हा होईल. त्याचवेळेस संभावनानं सर्व महिला वर्गाला संबोधित करुन म्हटलं की,''ज्या महिला स्वतःकडे दुर्लक्ष करत असतील त्यांनी प्रथम स्वतःची काळजी घ्यावी. बाकी इतर गोष्टींकडे नंतर लक्ष द्या. आपण हेल्दी,तर कुटुंब हेल्दी''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT