Sameer Wankhede Aryan khan eight other friends NCB  esakal
मनोरंजन

Sameer Wankhede : 'सेक्स पिल्स घेतल्यानंतर...' वानखेडेंचे व्हाट्स अप चॅट व्हायरल

यासगळ्यात तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमनं मोठी कारवाई केली होती. त्यांनी शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक केली होती.

युगंधर ताजणे

Sameer Wankhede Aryan khan eight other friends : किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं ते प्रकरण भलतचं चर्चेत आलं होतं. मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. त्या पार्टीत ड्रग्जचा पुरवठा होणार असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली त्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. यासगळ्या प्रकरणाकडे हायप्रोफाईल केस म्हणून पाहिलं गेलं आहे.

यासगळ्यात तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमनं मोठी कारवाई केली होती. त्यांनी शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे वेगळ्याच अँगलनं पाहिलं गेलं. पुढे त्याला राजकीय रंग मिळाल्यानं हे प्रकरण अधिक चिघळलं. कोर्टातील सुनावण्या, रोज नवनवीन खुलासे यामुळे त्याची चर्चा होत राहिली.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

आता सीबीआयनं वानखेडे यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करणे, प्रोटोकॉल न पाळणे याशिवाय अनेक तक्रारी वानखेडेंच्या विरोधात करण्यात आला आहे. दुसरीकडे वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ऱ्हिट याचिका दाखल केली आहे. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी यांनी देखील वानखेडे प्रकरणात साक्ष दिली आहे.

वानखेडे यांचे ते व्हाट्स अप चॅट समोर आले असून त्यामध्ये त्यांनी आर्यन खान आणि त्याचे ते आठ मित्र यांच्या रेव्ह पार्टीविषयी दुसऱ्या एका अधिकाऱ्याला सांगितले आहे. त्या व्हायरल झालेल्या चॅटनुसार ती रेव्ह पार्टी प्रमोट करण्यासाठी आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना तीन लाखांचे तिकिट फ्रीमध्ये देण्यात आले होते. एवढेच नाहीतर त्या ड्रग्ज माफियानं काही सेक्स पिल्सविषयीची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून ते चॅट व्हायरल झाले आहे.

सेक्स पिल्स घेतल्यानंतर आणि असुरक्षित सेक्स केल्यानंतर गुप्तरोग आणि अबॉर्शनचा धोका अधिक आहे. असेही त्या चॅटमध्ये म्हटले आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग नावाच्या अधिकाऱ्यासोबत हे चॅटिंग झाले असून त्यामध्ये वानखेडे यांनी यावेळी आर्यन खान सारख्या सेलिब्रेटीचा देखील यासारख्या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीचा कशाप्रकारे वापर केला जातोय हेही त्यातून स्पष्ट होते आहे.

ज्ञानेश्वस सिंग आणि वानखेडे यांच्यातील हे चॅट जेव्हा आर्यन खानला अटक झाल्यानंतरचे आहे. त्या चॅटनुसार आर्यन खान आणि त्याच्या आठ मित्रांना त्या रेव्ह पार्टीचे प्रमोशन करण्यासाठी २७ लाख रुपये देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT