Sanskrutik Kaladarpan Award Ceremony
Sanskrutik Kaladarpan Award Ceremony Instagram
मनोरंजन

Mohan Joshi: ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'नं सम्मानित

प्रणाली मोरे

Sanskrutik Kaladarpan Award Ceremony: मनोरंजन क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 'सांस्कृतिक कलादर्पण' पुरस्कार.

पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या कलाकृतीचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून नुकताच हा दैदिप्यमान सोहळा मुंबईत पार पडला.

यावेळी चित्रपट, नाटक, मालिका, तंत्रज्ञ, पत्रकारिता, अशा विविध विभागातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्याला कलासृष्टीला अनेक तारेतारका, मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. चित्रपट विभागात 'मदार' चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी प्रसाद ओक ( धर्मवीर मु. पो. ठाणे) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी शिवाली परब ( प्रेम कथा धुमशान) आणि अमृता अग्रवाल (मदार) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त पिकासो, इंटरनॅशनल फालम फोक, वाळवी, ताठकणा, गावं आलं गोत्यात १५ लाख खात्यात, पांडू, बालभारती, टाइमपास ३, आता वेळ आली, शहीद भाई कोतवाल या चित्रपटांनीही विविध विभागात पुरस्कार प्राप्त केले आहेत.

यावेळी नाट्य विभागात 'सफरचंद' या नाटकाने सर्वात जास्त पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशा विभागांत पुरस्कार मिळाले आहेत.

तर चर्चा तर होणारच, कुर्र, पुनश्च हनिमून, वाकडी तिकडी, वुमन या नाटकांनाही विविध विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. तर टि. व्ही. मालिका विभागात संत गजानन शेगावीचे ( सन मराठी tv) मालिकेने मालिकेने 'सर्वोत्कृष्ट मालिके'चा मान मिळवला असून लक्षवेधी मालिकेचा पुरस्कार 'ठिपक्यांची रांगोळी'(स्टार प्रवाह) ला मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शशांक केतकर (मुरंबा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ज्ञानदा रामतीर्थकर (ठिपक्यांची रांगोळी) यांना मिळाला आहे. तुमची मुलगी काय करते, बॉस माझी लाडाची यांनीही पुरस्कार पटकावले. तर पत्रकारिता विभागातही अनेकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या सोहळ्याविषयी संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे म्हणतात, "अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्याची शान वाढवली. यापैकी काही मान्यवर खूप वर्षांपासून आमच्या परिवारात आहेत तर काही मान्यवर नव्याने आमच्या परिवारात सहभागी झालेत. त्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो.

कला क्षेत्रातअमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे आम्ही मागील अनेक वर्षांपासून करतोय.

अशीच उत्तमोत्तम कलाकृती वर्षानुवर्षं या कलाकारांकडून होवो, अशीच इच्छा व्यक्त करतो.'' या दिमाखदार सोहळ्याचे ब्रॉडकॉस्ट पार्टनर "सन मराठी TV" होते.लवकरच हा भव्य सोहळा सन मराठी TV वर पहायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

SCROLL FOR NEXT