Sara Ali Khan Esakal
मनोरंजन

Sara Ali Khan: क्रिकेटरशी लग्नगाठ बांधण्याविषयी स्पष्टच बोलली सारा अली खान.. सांगून टाकला लग्नाचा प्लॅन..

भारतीय टीममधील क्रिकेटर शुभमन गिलसोबत काही दिवसांपूर्वी सारा अली खानचं नाव जोडलं गेलं होतं.

प्रणाली मोरे

Sara Ali Khan Marriage: आपल्या सिनेमांसोबतच बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असलेली पहायला मिळते. खूप काळापासून चर्चा आहे की सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत आहे. यासंदर्भात सारा आणि शुभमन दोघांनीही बोलणं नेहमीच टाळलं आहे.

पण आता नवरा म्हणून कसा मुलगा आपल्या आयुष्यात हवा आहे याविषयी सारा अली खाननं आपलं मत स्पष्ट केलं आहे. तिनं आता सांगितलं आहे की, ''तिला एक असा जोडीदार तिच्या आयुष्यात हवा आहे जो तिच्यासारखाच असेल,तिच्या विचारांशी त्याचे विचार जुळतील. मग तो काय काम करतो याचा फार विचार मी करणार नाही. तो डॉक्टर,इंजिनिअर,बिझनेसमन की क्रिकेटर कोण आहे यानं मला फरक पडणार नाही''.(Sara Ali Khan on her dream man, wedding plan)

सारा अली खान सध्या तिचा नवा सिनेमा 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित एका मुलाखतीत साराला जेव्हा विचारलं गेलं,''तू तुझी आजी शर्मिला टागोर यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटरशी लग्न करणार का?'',त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर देताना सारानं आपलं लग्नाविषयीचं मत स्पष्ट मांडलं आहे.

सारा म्हणाली, ''माझ्या विचारांशी ज्याचे विचार जुळतील अशा माणसाशी मला लग्न करायला आवडेल. मग तो काय करतो याचा विचार मी फार करणार नाही. तो डॉक्टर,इंजिनिअर,अॅक्टर की क्रिकेटर कोणीही असू देत. मेंटली आणि इंटेलेक्चुअल लेवलवर आमची मतं जुळायला हवीत. त्या व्यक्तीपेक्षा या गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत'', असं सारा म्हणाली.

'भारतीय टीमधील कोणत्या क्रिकेटरला ती डेट करताय का?' असा प्रश्न देखील साराला या विचारला गेला.

त्यावर अभिनेत्री म्हणाली की,''ज्या व्यक्तीसोबत तिला आयुष्य काढायचं आहे त्याला ती अजून भेटलेली नाही''.

काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि शुभमन गिलनं एकमेकांना अनफॉलो केलं ज्याची जोरदार चर्चा रंगली होती.

२ जून,२०२३ रोजी साराचा 'जरा हटके जरा बचके' सिनेमा आपल्या भेटीस आला आहे. या सिनेमात तिच्यासोबत विकी कौशल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली आहे. सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पाच दिवसांत सिनेमानं ३०.६० करोडची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT