sara ali akhan and ibrahim ali khan  esakal
मनोरंजन

सारा म्हणतेय 'चलो दिलदार चलो...' तर इब्राहीम... 

'सिबलिंग्स डे'च्या निमित्ताने सारा अली खान आणि इब्राहिम यांनी एक धमाल व्हिडिओ शेअर केला असून दोघांच्या खोडकरपणाबाबत आई अमृता सिंह म्हणतेय तुम्ही दोघेही..

नीलेश अडसूळ

bollywood : बाॅलिवूड अभिनेते सैफ अली खान यांची कन्या अभिनेत्री सारा अली खान समाज माध्यमांवर कायम चर्चेत असते. नुकताच तिने 'सिबलिंग्स डे'च्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुले. सैफ आणि अमृताचा डिवोर्स झाला असला तरी त्यांच्यातील कौटुंबिक सलोखा चांगला आहे. सैफ सोबत त्यांची मुलेही चर्चेत असतात. सारा तर आपल्या अनेक गोष्टी शेअर करुन चाहत्यांना माहिती देत असते.

साराने (sara ali khan) नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती, तिचा भाऊ इब्राहिम आणि आई अमृता सिंह दिसत आहे. ते तिघेही एका हेअर पार्लर मध्ये गेल्याचे दिसत आहेत. या तिघांचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला असून त्यात सारा चक्क गाणं गात आहे. त्यांच्यातील मस्ती कॅमेऱ्यात कैद करताना तिने चाहत्यांना ‘सिबलिंग्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडीओत सारा इब्राहिमला विचारते, ‘इग्गी तुला वाटतं की आपण दोघेही सारखेच आहोत?’ त्यावर तो म्हणतो ‘अजिबात नाही’. यानंतर त्यांची आई अमृता म्हणते की ‘तुम्ही दोघेही प्रचंड खोडकर आहात आणि तुम्हा दोघांच्या मागण्याही तशाच असतात.’

पुढे दोघेही काहीतरी पिताना दिसत आहे. यावर सारा इब्राहिमला विचारते, तू नक्की काय पीत आहेस? त्यावर तो म्हणतो, कॅरमेल फ्रॅपेचिनो. हे ग्लूटेन फ्री नाही. हे शरीरासाठीही अयोग्य आहे. पण हे फार चविष्ट आहे. आणि तू?.. त्यावर सारा म्हणते ‘मी ब्लॅक कॉफी पित आहे. त्यात बर्फ आहे. पण साखर आणि दूध अजिबात नाही.'

व्हिडीओच्या शेवटी सारा ही तिच्या आईकडे इब्राहिमची तक्रार करताना दिसत आहे. इब्राहिमला तयार होण्यासाठी फार वेळ लागतो, असे ती म्हणते. तर मला त्याच्यापेक्षा चांगले गाता येते असं म्हणून ती 'चलो दिलदार चलो.. चांदके पार चलो' हे गाणं गाऊ लागते. त्यावर तू फारच वाईच गात असल्याची प्रतिक्रिया इब्राहिम साराला देतो. तसेच या गाण्याला दहापैकी शून्य गुण देतो असेही तो म्हणतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेक भावंडांनी आम्हीही असेच खोडकर आहोत असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT