Satish Kaushik And Mahima Chaudhry Instagram
मनोरंजन

Satish kaushik: मृत्यूच्या काही तास आधीच सतिश कौशिक यांनी महिमा चौधरीला दिला होता 'हा' सल्ला..म्हणालेले..

७ मार्च रोजी जावेद अख्तर यांनी दिलेल्या होळी पार्टीत महिमा चौधरी आणि सतिश कौशिक यांनी एकत्र फोटो क्लिक करत मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.

प्रणाली मोरे

Satish kaushik: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता सतिश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यांच्या अचानक निधनानं बॉलीवूडवर मात्र शोककळा पसरली आहे.

सतिश कौशिक यांना अस्वस्थ वाटून हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते गाडीनं प्रवास करत होते. ड्रायव्हरने कौशिक यांच्या सांगण्यावरनं त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण डॉक्टरही सतिश कौशिक यांना वाचवू शकले नाहीत.

सतिश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. कारण ७ मार्च रोजी जावेद अख्तर यांच्या होळीच्या फिल्मी पार्टीत सतिश कौशिक हजर होते.

त्यांनी रंगाचा खेळ मस्त एन्जॉय केला हे त्यांच्या फोटोवरनं लक्षात येत आहे. हेच फोटो सतिश कौशिक यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि हिच त्यांची पोस्ट अखेरची पोस्ट ठरली. (Satish kaushik few hours before he died said this thing to mahima chaudhry)

याच पार्टित महिमा चौधरी देखील सामिल झाली होती. सतिश कौशिक आणि महिमानं एकत्रित खूप फोटो काढले आणि मनसोक्त गप्पांचा फडही त्यांच्यात रंगला. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर आता महिमानं त्या गप्पांमध्ये कौशिकांनी आपल्याला काय सल्ला दिला होता याविषयी खुलासा केला होता.

इंडिया टूडेसोबत बोलताना महिमा चौधरीनं म्हटलं की, ''७ मार्चला सतिश कौशिक यांच्यासोबत केलेली होळी पार्टी खूप आठवतेय आज. त्या पार्टीत ते मला म्हणाले होते की,आपली मुलं खूप लहान आहेत आणि आपल्यालाच त्यांची काळजी घ्यायची आहे. मला माहित असतं की ही आमची शेवटची भेट आहे तर मी एक घट्ट मिठी त्यांना मारली असती''.

''त्यांनी मला पुन्हा जोमानं काम करण्याचा सल्ला दिला. म्हणाले,एक दिवस ऑफिसला ये. मी कोरोनात काही सिनेमे केलेयत ते दाखवेन. आपण नव्या प्रोजेक्टविषयी बोलू. एकत्र काम करू ..तू एक चांगली अभिनेत्री आहेस''.

हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

महिमा चौधरी आणि सतिश कौशिक यांनी कंगनानं दिग्दर्शित केलेल्या 'इमरजन्सी' सिनेमात एकत्र काम केलं आहे.

महिमा पुढे म्हणाली,''आम्ही 'इमरजन्सी'त एकत्र काम केलं आहे. ते खूपच हसत-खेळत काम करायचे. खूप प्रेमळ व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी 'इमरजन्सी' सिनेमात राजकीय नेते जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे. जेव्हा त्यांना शॉट देताना मी पहायचे तेव्हा त्यांची एनर्जी लेवल पाहून मी थक्क होऊन जायचे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT