Kartik Aryan Post Shocked Fans:  Esakal
मनोरंजन

Kartik Aryan Post: छोटा हार्ट अटॅकच दिलास भावा! कार्तिकच्या 'त्या' फोटोने सोशल मिडियावर उठलं वादळ

Vaishali Patil

Kartik Aryan Post Viral: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन या आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत ओळख निर्माण केले आहे. आता तर कित्येक मुलींचा क्रश बनला आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या छोट्या करिअरमध्ये अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो सिने इंडस्ट्रीमधील 'Most eligible bachelor' आहे.

मात्र आता तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे, त्याने त्याच्या लग्नाचा फोटो सोशल मिडियावर शेयर केला आणि त्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. कार्तिकनं खरचं लग्न केलं का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला.

खरं तर हा फोटो कार्तिकच्या नाही तर सत्तूच्या लग्नाचा आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' 29 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

याआधी कार्तिक आणि कियारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून या चित्रपटाचे प्रमोशन करताना कार्तिक आर्यनने त्याच्या कियारासोबतचा स्वतःचा असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून चाहते क्षणभर थक्क झाले.

कार्तिकनं शेयर केलेल्या फोटोमध्ये तो आणि कियारा वधू -वर म्हणून बसले आहेत, गळ्यात हार घालून एकमेकांकडे हसत आहेत. खर तर रिअल लाइफ लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर करतात तसाच हा फोटो होता. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना पहिल्या नजरेत वाटलं की कार्तिनचं लग्न केले.

पण नंतर त्यांना कळते की हा फोटो कार्तिक-कियारा यांच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातील आहे.

हा फोटो शेयर करत कार्तिकनं लिहिलं की, 'आमच्या जे आवडीचं होत ते तुमचं आवडतं बनवल्याबद्दल धन्यवाद, सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद... #satyapremkikatha.'

'भूल भुलैया 2' या हिट चित्रपटानंतर कार्तिक आणि कियारा पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सुप्रिया पाठक, गजराज राव, अनुराधा पटेल, राजपाल यादव असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षी 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. त्याच वेळी, निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT