savdhan india  Team esakal
मनोरंजन

सावधान इंडिया फेम दोन अभिनेत्रींना अटक, मित्राच्याच घरी चोरी

सावधान इंडिया या मालिकांमध्ये काम करणा-या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील (entertainment news) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे क्राईम पेट्रोल (crime pertol and savdhaan india) आणि सावधान इंडिया या मालिकांमध्ये काम करणा-या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या दोन्ही अभिनेत्रींवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मित्राच्या घरातून तीन लाख 28 हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस करत आहे. (savdhaan india fame two tv actresses arrested by mumbai police accused robbery )

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसताना दिसत आहे. यामुळे अनेक कलाकारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मनोरंजन क्षेत्रातील काही कलावंतांनी आपल्या आर्थिक समस्येबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता एक मोठी घटना समोर आली आहे. या मालिकेतील दोन्ही अभिनेत्रींना आर्थिक (lockdown) समस्येला सामोरे जावे लागत होते. लॉकडाऊनच्या काळात त्या काम करत असलेल्या मालिका बंद झाल्या होत्या. त्यामुळे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर होता.

दोन्ही अभिनेत्रींचा एक मित्र आरे कॉलनीमध्ये पेइंग (arey colony) गेस्ट चालवतो. त्याठिकाणी दोघेजण काही दिवसांपूर्वी राहण्यासाठी आले होते. तिथल्या एकाच्या घरातील लाखो रुपये घेऊन त्या फरार झाल्या होत्या. अखेर त्यांना गोरेगाव पूर्व आरे पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 18 मे ला घडला होता. आरे कॉलनीमध्ये रॉयल पाम नावाची मोठी सदनिका आहे. त्यात या दोन्ही अभिनेत्रींचा एक मित्र राहतो. त्यावेळी या दोघीजणी त्याच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहिल्या होत्या.

यापूर्वी तिथं राहणा-या एका पेईंग गेस्टनं त्या घरातल्या तिजोरीत तीन लाख 28 हजार रुपये ठेवले होते. या दोघींनी त्या तिजोरीचे लॉक तोडून ते पैसे लंपास केले. याप्रकरणी अभिनेत्री सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि तिची अल्पवयीन मैत्रीण हिला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT