sayali sanjeev ani shivani surve jhimma 2 marathi movie Esakal
मनोरंजन

Jhimma 2: सायली संजीवची कोणती गोष्ट खटकते? शिवानी सुर्वेचा खुलासा

सायली संजीव - शिवानी सुर्वे यांना एकमेकींची कोणती गोष्ट खटकते?

Devendra Jadhav

झिम्मा २ सिनेमा उद्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्माच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. आता पुन्हा एकदा सर्वांचं मनोरंजन करायला झिम्मा २ सज्ज झालाय.

यानिमित्ताने सकाळने झिम्मा २ मधील अभिनेत्री सायली संजीव आणि शिवानी सुर्वे यांच्याशी खास गप्पा मारल्या. तेव्हा सायली - शिवानीने एकमेकींची खटकणारी गोष्ट सांगितली.

(jhimma 2 marathi movie)

सायलीची कोणती गोष्ट शिवानीला खटकते?

सायलीची कोणती गोष्ट शिवानीला खटकते असं विचारताच शिवानी म्हणाली, "असं खटकण्यासारखं काही नाहीय. पण माझा जो शॉपिंगचा उत्साह असतो तसा उत्साह तिचा का नसतो मला कळत नाही."

शिवानीला मध्येच थांबवुन सायली म्हणाली, "तुला असं वाटतं शिवानी. मी खुप शॉपिंग करते. मला थांबवायला लागतं की बास्स, इतकी शॉपिंग मी करते."

पुढे शिवानी म्हणाली, "म्हणुन तू येत नाहीस का. आम्ही परदेशात गेलेलो तेव्हा ती नाही म्हणाली शॉपिंगला. अरे यार असं कोण म्हणतं."

सायली मग शेवटी म्हणाली, "मी नाही म्हणते यासाठी की शॉपिंग करताना माझा कंट्रोलच नाहीय. मी नाही म्हणाले कारण मी २ महिने परदेशात होते आणि माझ्याकडे बॅग्ज कमी पडायला लागल्या. मी दोन रिकाम्या बॅग घेऊन गेले होते त्या शॉपिंगने खच्चाखच्च भरल्या. सो मी परत कशी शॉपिंग करु? मला घरात घेणार नाहीत."

शिवानीची कोणती गोष्ट सायलीला खटकते?

पुढे शिवानीची कोणती गोष्ट खटकते असं विचारताच सायली म्हणाली, "आम्ही दोघी एकमेकींशी स्पष्ट बोलतो. आम्ही आधी तशा नव्हते.पण आता झिम्मा 2 निमित्ताने आमच्यात चांगली मैत्री झाली. शिवानीची एक गोष्ट खटकायची. पण आता तिने ती गोष्ट बदललीय. ते म्हणजे ती पटकन एखाद्या गोष्टीला रिअॅक्ट होते.

ती प्रत्येक गोष्टीला रिअॅक्ट व्हायची. पण नंतर तिने मला फोन केला की, मला आता कळलंय की प्रत्येकवेळी रिअॅक्ट होणं गरजेचं नसतं. मला वाटायचं की शिवानीचं रिअॅक्ट होणं खुप लोकांना हवंय. आणि त्याचं त्यांनी भांडवल करु नये. पण आता ती गोष्ट तिने बदललीय."

झिम्मा 2 मध्ये तगड्या कलाकारांची फौज

महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना झिम्मा 2 ची उत्सुकता आहे. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत

हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत. 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT