Shaan – Jaspinder Narula And Bhumika Trivedi Kick Starts Swayamvar Mika Di Vohti With King Mika Singh Google
मनोरंजन

मिका सिंगच्या लग्नाचा शाही थाट; जोधपूरमध्ये रंगणार 'स्वयंवर-मिका दि वोटी'

स्टार भारत' वाहिनीने 'स्वयंवर-मिका दि वोटी' च्या भव्य-दिव्य सेटचे अनावरण 'उम्मेद जोधपूर पॅलेस रिसॉर्ट अँड स्पा' येथे केले.

अरुण सुर्वे

'स्टार भारत' वाहिनीने आपल्या बहुप्रतिक्षित शो 'स्वयंवर-मिका दि वोटी'(Swayamvar Mika Di Vohti) च्या भव्य आणि दिव्य सेटचे अनावरण सुंदर 'उम्मेद जोधपूर पॅलेस रिसॉर्ट अँड स्पा' येथे केले. रिसॉर्ट फुलांनी, दिव्यांनी आणि मेणबत्त्यांनी सजले होते. मिका सिंग(Mika Singh) आणि सर्व सुंदर स्पर्धकांच्या .व्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी उपस्थित असल्याने येथे संपूर्ण उत्सवाचे वातावरण होते. भव्य प्रक्षेपणात भर घालण्यासाठी, संपूर्ण राजवाड्यात अनेक नेत्रदीपक कार्यक्रम आणि संगीतमय उत्सव आयोजित केला गेला.

या सुंदर रात्रीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लोकसंगीतकार, काही जवळचे मित्र आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान, कार्यक्रमाचा सूत्रधार आणि यांचे हृदयाला भिडवून टाकणारे सादरीकरण देखील येथे आयोजित करण्यात आले होते. बॉलीवूड म्युझिक ही इथे जोरात चालू होते. याशिवाय, संगीतप्रेमी जसपिंदर नरुला आणि भूमी त्रिवेदी सारखे चमकणारे तारे मिकाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

या ऐतिहासिक शो मध्ये 12 स्पर्धक आणि मिका सिंग दिसणार आहेत, जे एकमेकांचे प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करतील. आणि हा शो 'मेलडी किंग' शान होस्ट करणार आहे! मिका सिंग त्याच्या ड्रीम गर्लला शोधण्यासाठी निघाला असताना शान, मिकाचा मित्र आणि शोचा होस्ट, प्रेक्षकांना खऱ्या मिका सिंगची ओळख करून देईल, जो 'पब्लिक फिगर' मिकाच्या मागे लपला आहे.

या सोनेरी संध्याकाळबद्दल आणि शो चा स्टार, गायक आणि कलाकार मिका सिंग म्हणतो, “मी खूप उत्साही आहे. इतरांच्या लग्नात खूप धिंगाणा - भांगडे घातला, आता माझी वेळ आहे. मी माझ्या स्वप्नातील मुलगी शोधण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. स्टार भारत 'स्वयंवर - मिका दी वोटी' या शो ने मला माझी जीवनसाथी निवडण्याची संधी दिली आहे आणि जेव्हा या शो साठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा जणू माझ्या नशिबाचे द्वार उघडले होते!

तब्बल 14 वर्षांनंतर एका रियालिटी शोचे सूत्रसंचालन करण्यासाठी परतलेल्या शानने आपला उत्साह व्यक्त करताना म्हटले, "मी खूप आनंदीत होतो आणि या संधीला 'नाही' म्हणू शकलो नाही. माझा मित्र शेवटी स्वतःसाठी सर्वोत्तम जीवनसाथी शोधणार आहे. एकीकडे मी खूप उत्साही आहे पण त्याचबरोबर मी थोडासा चिंताग्रस्त आहे. कारण ही माझी खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याला त्यात योग्य निवड करण्यात मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. पण मी माझ्या भावासाठी काहीही करू शकतो आणि त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे.”

या सेलिब्रेशनबद्दल भूमी त्रिवेदी म्हणाली, “आम्ही नेहमीच चांगले मित्र आहोत, आणि मी त्याबद्दल कधीही बोललो नाही, कारण मला त्याची गरज वाटत नव्हती. स्टार भारत परिवार आणि मिका पाजी यांच्या आयुष्यातील नवीन अध्यायाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे.

मिका सिंगसोबत परफॉर्म करताना जसविंदर नरुला म्हणाली, “आम्ही पाजीसाठी गायलेले प्रत्येक गाणे आणि जितके आमचे पाय थिरकले आहेत, त्या प्रत्येक बीटमध्ये मला सकारात्मक ऊर्जा आणि आनंद जाणवला आहे. मिका माझ्यासाठी लहान भावासारखा आहे आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. मी वैयक्तिकरित्या मीकासाठी खूप उत्साहित आहे आणि त्याने सेटल व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यासाठी योग्य जीवनसाथी निवडण्याचे काम त्यांनी माझ्यावर आधीच सोपवले आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि या अद्भुत शोधाबद्दल मी स्टार भारतचे आभार मानू इच्छिते! या सेलिब्रेशनचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंदाचं होतं. माझ्या लहान भावाला जीवनसाथी म्हणून एक सुंदर मुलगी मिळावी यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देते!”

या खास प्रवासाचा एक भाग होण्यासाठी आमच्यात सामील व्हा कारण डॅशिंग मिका सिंग त्याच्या ड्रीम गर्लचा शोध सुरू करणार आहे- फक्त 'स्वयंवर - मिका दी वोटी' वर. 'स्वयंवर - मिका दी वोटी' ची निर्मिती सोल प्रॉडक्शन आणि शो स्टार भारत प्रस्तुत करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT