Shah Rukh Khan Bollywood Actor share Amitabh Bachchan  esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'तू नशेत होता, त्यावेळी तुला...' अमिताभ यांनी शाहरुखला दिला मोलाचा सल्ला!

येत्या काळात त्याचा जवान आणि डंकी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच शाहरुखची एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Bollywood Actor share Amitabh Bachchan : बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान यांच्यात नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चा होत असते.

भलेही दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असेल मात्र चाहते आणि नेटकरी या दोघांमध्ये बऱ्याचदा तुलना करताना दिसतात. आता अमिताभ यांनी शाहरुखला जो सल्ला दिला होता त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

शाहरुखच्या पठाणनं हजार कोटींची कमाई करुन मोठा विक्रम रचला होता. त्याचा तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मोठा वाद झाला होता. आमिर प्रमाणे शाहरुखच्या चित्रपटाला देखील अपयशाचा सामना करावा लागेल अशी भीती होती.

मात्र पठाणनं ती भीती फोल ठरवत मोठी कमाई केली आहे. येत्या काळात त्याचा जवान आणि डंकी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच शाहरुखची एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

शाहरुखनं त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अमिताभ बच्चन यांनी सांगितलेली ती गोष्ट आपण विसरलेलो नाही असे सांगितले आहे. सोशल मीडियावर शाहरुखच्या त्या जुन्या मुलाखतीचा काही भाग व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये शाहरुख अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख करत म्हणतो की, अमितजी हे मितभाषी म्हणून आपल्याला माहिती आहे. मात्र एकदा आम्ही भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक सल्ला मला दिला होता.

ते मला म्हणाले, तू आता मोठा स्टार झाला आहेस. तेव्हा तू काहीही कर पण जेव्हा तुला असे वाटेल की, तुझ्या हातून मोठी चूक झाली आहे तेव्हा ती कबूल कर.

मी तरुण होतो तेव्हा मोठ्या धाडसानं अमिताभ यांना म्हणालो, पण अमितजी मी जर चुकलोच नसेल तर... त्यावेळी ते म्हणाले, मी तेच तर म्हणतो आहे आपण नेहमी नम्र असले पाहिजे.

आदरानं बोलायला शिकले पाहिजे. तुला कुणी मारले आणि तू त्याला मारले यानं काय होईल...तू तेव्हा नशेत होता हे तुलाही माहिती नव्हते.

शाहरुख म्हणतो पण मी नशेत नव्हतो. त्यावेळी अमिताभ म्हणाले, तू नव्हता हे तू नाही तुझ्याकडील पैसा बोलतो आहे. अशा शब्दांत अमिताभ यांनी माझी कानउघाडणी केली होती. त्यांनी सल्ला नेहमीच लक्षात ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT