Shah Rukh Khan Bollywood King Khan called Mother And Son esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : किंग खान कोणत्या सेलिब्रेटींना म्हणतो बेटा अन् कुठल्या अभिनेत्रीला म्हणतो आई?

बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुखचे नाव घेतले जाते. यंदाचे वर्ष किंग खानसाठी खूपच लाभदायी ठरल्याचे दिसून येत आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Bollywood King Khan called Mother And Son : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुखचे नाव घेतले जाते. यंदाचे वर्ष किंग खानसाठी खूपच लाभदायी ठरल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा पठाण आणि त्यानंतर जवान या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. नुकताच शाहरुखचा ५८ वा बर्थ डे साजरा झाला.

शाहरुखच्या बर्थ डे निमित्तानं त्याला ज्यांनी विश केले त्यांना शाहरुखनं थेटपणे बाळा, बेटा, मुला असे म्हणून संबोधले. ज्याची खूपच चर्चा सुरु झाली. किंग खान आता अनेकांना लाडानं, प्रेमानं आपली मुलं असे म्हणून संबोधू लागला आहे, अशा अर्थाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. रिंकू सिंग, रॉबिन उथप्पा, उमेश यादव, गौतम गंभीर आणि रहमानुल्लाह यांच्यासह अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप आणि उत्तर भारतात धक्के असं का?

आता शाहरुख अशा चित्रपटांमध्ये काम करत आहे त्यातून तो वेगळ्या धाटणीच्या भूमिका करु इच्छितो. त्यानं एका मुलाखतीमध्ये आपण आता रोमँटिक भूमिका करण्यास प्राधान्य देणार नाही असे म्हटले होते. जवानमध्ये त्यानं साकारलेला विक्रम राठोड लोकप्रिय झाला. त्यातील त्याचा म्हातारपणातील तो लूक प्रेक्षकांना, चाहत्यांना खूपच भावला होता. त्याची चर्चाही झाली होती.

शाहरुखनं क्रिकेटर्सला देखील बेटा म्हटले होते....

क्रिकेटर रिंकू सिंगनं शाहरुख खानसोबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यानं किंग खानला बर्थ डे विश केलं होतं. त्याला रिप्लाय देताना शाहरुखनं म्हटलं होतं की, मी तुझा खूप खूप आभारी आहे बेटा...पुन्हा भेटल्यानंतर गळाभेट घ्यायला विसरु नकोस...याशिवाय उमेश यादवनं देखील शाहरुखला विश केले होते. तेव्हा शाहरुखनं त्याचे आभार मानत देव तुझ्यावर नेहमीच कृपा करु बेटा....असे म्हटले होते.

सिद्धार्थ मल्होत्रानं शाहरुखला बर्थ डे विश केले होते. यावेळी त्या ट्विटला त्यानं रिट्विट केले होते. त्यात तो सिद्धार्थला म्हणाला होता की, लव यू बेटा...आनंदी राहा...विनित कुमार सिंगच्या ट्विटवर देखील एसआरकेनं लिहिलं होतं की, खूप खूप आभारी बेटा, तुला खूप सारं प्रेम...अशा शब्दांत किंग खाननं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

शाहरुखनं वाढदिवसाच्या निमित्तानं जो व्हिडिओ शेयर केला होता त्यात त्यानं त्या अभिनेत्रीचा उल्लेख आई म्हणून केला. ती अभिनेत्री म्हणजे रिद्धी डोंगरा. तिनं जवानमध्ये शाहरुखच्या आईची भूमिका केली होती. त्या भूमिकेनं रिद्धी प्रसिद्धीच्या झोतातही आली होती. शाहरुखच्या ट्विटला उत्तर देताना रिद्धीनं म्हटलं होतं की, यापेक्षा आणखी वेगळ्या शुभेच्छा कशा असू शकतात. त्यावर शाहरुखनंही पुन्हा टविट करत म्हटलं होतं की, खूप खूप धन्यवाद आई...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT