shah rukh khan dunki movie box office collection day 1  SAKAL
मनोरंजन

Dunki Box Office Day 1: शाहरुखच्या 'डंकी'ची निराशा? पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर कमावले फक्त इतके कोटी

शाहरुख खानच्या डंकी सिनेमाचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय

Devendra Jadhav

Dunki Box Office Day 1: शाहरुखच्या डंकी सिनेमा काल गुरुवारी २१ डिसेंबरला संपूर्ण देशात रिलीज झाला. 'डंकी'ची गेली अनेक महिने उत्सुकता होती. त्यातच २०२३ मध्ये शाहरुखने पठाण, जवान या दोन्ही सिनेमांच्या माध्यमातून बॉक्स ऑफीस चांगलंच गाजवलं.

अशातच 'डंकी' किती कमाई करेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. डंकी पाहून लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरीही सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर किती कमाई केली हे जाणून घेऊ.

(shah rukh khan dunki movie box office collection day 1)

डंकीची बॉक्स ऑफीसवर कमाई

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, शाहरुखच्या डंकीने बॉक्स ऑफीसवर पहिल्या दिवशी फक्त ३० कोटींची कमाई केलीय. शाहरुखचे या वर्षी पठाण, जवान हे दोन सिनेमे रिलीज झाले. या दोन सिनेमांच्या तुलनेत शाहरुखच्या डंकीची ही सर्वात कमी कमाई आहे असं म्हणता येईल.

डंकी पाहून लोकांची घोर निराशा झाली आहे. अनेकांनी X वर DUNKI DISASTER असा हॅशटॅग ट्रेंड केलाय. याचा परिणाम डंकीच्या कमाईवर झालाय हे स्पष्ट दिसतंय.

डंकी पाहून लोकांची निराशा

बॉलिवूडचे प्रतिभावान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी डंकी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डंकी पाहिल्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे. काहींना हा सिनेमा कमाल वाटला आहे तर अनेकांची हा सिनेमा पाहिल्यानंतर निराशा झाली आहे.

सिनेमा पाहून प्रेक्षकांनी शाहरुख खान पेक्षा जास्त तर चर्चा विकी कौशलची केली आहे. विकीच्या अभिनयाचे खुपच कौतुक होत आहे.

डंकीबद्दल थोडंसं...

राजकुमार हिरानी यांनी 'संजू', 'पीके', '3 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई ' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. आता पहिल्यांदाच राजकुमार हिरानींनी शाहरुख खानसोबत डंकी चित्रपट बनवला आहे या चित्रपटाची चाहत्यांना अनेक महिन्यांपासून उत्सुकता होती. हा सिनेमा २२ डिसेंबरला रिलीज झाला आहे. या सिनेमात शाहरुखसोबत विकी कौशल, तापसी बन्नू, विक्रम कोचर, बोमन इराणी असे कलाकार झळकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : चुटकीवाला भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांची धडक कारवाई

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

SCROLL FOR NEXT