shah rukh mannat 
मनोरंजन

'मन्नत'वर येऊ नका; शाहरुखच्या टीमकडून सेलिब्रिटींना विनंती

आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे.

स्वाती वेमूल

Cordelia Cruise क्रूझवर पार्टी करण्यासाठी ड्रग्ज घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan आठही जणांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे. काहींनी मन्नत बंगल्यावर जाऊन त्याची भेट घेतली, तर काहींनी त्याला फोन करून विचारपूस केली. सोशल मीडियाद्वारेही अनेक कलाकारांनी शाहरुखला साथ दिली आहे. मात्र आता भेट घेण्यासाठी मन्नत बंगल्यावर येऊ नका अशी विनंती शाहरुखच्या टीमकडून इतर सेलिब्रिटींना करण्यात आली आहे.

सलमान खान, अर्पिता खान, गौरी खानच्या मैत्रिणी महीप कपूर, सीमा खान यांसारख्या सेलिब्रिटींनी मन्नत बंगल्यावर शाहरुखची भेट घेतली. मात्र बंगल्याबाहेर सतत पापाराझी आणि पत्रकार असल्याने, त्याचप्रमाणे भेट देण्यासाठी येणाऱ्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने शाहरुखच्या टीमकडून त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली आहे. 'इंडिया टुडे'नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इंडस्ट्रीतील बरेच कलाकार शाहरुखच्या बाजूने असल्याचंही म्हटलं जात आहे. शाहरुखचे सहकलाकार राणी मुखर्जी, काजोल, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांनीसुद्धा फोन करून त्याची विचारपूस केली.

'आर्यनसाठी मी प्रार्थना करते. त्याची मदत करण्याची गरज आहे. त्याला उद्ध्वस्त करू नका', अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री नफिसा अली सोढी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. तर 'मुलगा अडचणीत सापडला असताना त्यातून मार्ग काढणं हे पालकांसाठी खूप त्रासदायक असतं. न्यायव्यवस्थेच्या आधी जेव्हा लोक त्याबद्दल निष्कर्ष काढू पाहतात, तेव्हा ते आणखीनच क्लिष्ट होत जातं. हा पालकांच्या आणि पालक-मुलांच्या नातेसंबंधांचा अनादर आहे. त्यांच्यासाठी हे अन्यायकारक आहे. एसआरके मी तुझ्यासोबत आहे', असं ट्विट हंसल मेहता यांनी केलं. अभिनेत्री पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांसारख्या सेलिब्रिटींनीही शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे. पूजाने 'चाहत' तर सुचित्राने 'कभी हा कभी ना' या चित्रपटात शाहरुखसोबत काम केलं होतं. पूजाने ट्विट करत लिहिलं, 'मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे अशातला भाग नाही. पण तरी माझा पाठिंबा आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल.' पूजाप्रमाणेच सुचित्रानेही ट्विट करत शाहरुखला साथ दिली. 'मुलांना संकटात पाहण्यापेक्षा कठीण पालकांसाठी काहीही नसतं. सर्वांसाठी प्रार्थना. बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्यांना एनसीबीने आतापर्यंत चित्रपट स्टार्सवर टाकलेले छापे लक्षात आहे का? त्यांना काहीही सापडलं नाही आणि काहीच सिद्ध झालं नाही. हा फक्त तमाशा आहे. ही प्रसिद्धीची किंमत आहे,' असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, दोन जखमी, चालकाचा डोळा लागला अन् तेवढ्यात कार...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी! विशालची बाथरुममधून 'ती' वस्तू हरवली, थेट कॅप्टनचं जेवण होणार बंद?

'कोर्टाने आदेश दिला म्हणून शरण आलो', जामीनावर बाहेर येताच मंत्रिपुत्राची पुन्हा 'दादागिरी'

Latest Marathi News Live Update : केऱ्हाळा जिल्हा परिषद गटात निवडणूक नात्यांची कसोटी ठरत असल्याचे चित्र

विदेशात करिअर करायचंय? वर्ल्ड बँक Pioneers Internship 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; आजच या संकेतस्थळावर क्लिक करा!

SCROLL FOR NEXT