anupam mittal, anupam mittal father passed away
anupam mittal, anupam mittal father passed away SAKAL
मनोरंजन

Anupam Mittal Father: शार्क टॅंक फेम अनुपम मित्तल यांच्या वडिलांचं निधन

Devendra Jadhav

Anupam Mittal Father Passed Away News: शार्क टॅंक फेम उद्योजक अनुपम मित्तल याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उद्योजक पीपल ग्रुपचे मालक आणि Shaadi.com या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत.

या व्यतिरिक्त, ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनुपम मित्तल यांच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली.

अनुपम मित्तल यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी, अनुपम मित्तलची पत्नी आंचल कुमारने तिच्या Instagram खात्यावर एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केले ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र पोज देताना दिसत आहे.

हा फोटो एका कौटुंबिक प्रसंगातला दिसतोय. अनुपमने हाच फोटो पुन्हा पोस्ट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “शाइन ऑन अस डॅडी.” म्हणजेच तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहूद्या.

अनुपम प्रत्येक मुलाखतीत नेहमी सांगतात की तो एक कौटुंबिक माणूस आहे आणि त्याच्या वडिलांच्या जवळ आहे. शार्क टँक इंडियाच्या एका एपिसोडमध्ये, उद्योजकाने त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या प्रवासात कशी प्रेरणा दिली हे आठवले.

एक आठवण सांगताना त्यांनी सांगितले की त्यांचे वडील हातमाग व्यवसायात होते आणि त्या लहान वयात अनुपम वडिलांचे बोट धरून यंत्रमाग पाहत असे. तेव्हाच त्यांच्या लहानग्या अनुपमच्या मनात बिझनेसचे बीज रोवले गेले.

गेल्या वर्षी फादर्स डेच्या दिवशी अनुपमने वडिल त्याची मुलगी एलिसासोबत केक कापतानाचा फोटो अपलोड केला होता.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा..." बाबांच्या निधनामुळे अनुपम मित्तल आणि त्यांचा संपुर्ण परिवार शोकसागरात बुडाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT