Shiney Ahuja approached for salman khan led reality show? Google
मनोरंजन

घरच्या मोलकरणीचा विनयभंग केल्याचा होता आरोप,शायनी आहूजा बिग बॉस 16 मध्ये?

बिग बॉस 16 चे निर्माते शायनी आहूजाला शो मध्ये सामिल करुन घेण्यासाठी हवे तितके पैसे मोजण्याच्या तयारीत आहेत.

प्रणाली मोरे

बिग बॉस च्या मेकर्सनी 16 व्या सिझनची तयारी करण्यासाठी सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी बातमी होती की शो च्या निर्मात्यांनी शो मध्ये काही वादग्रस्त सेलिब्रिटींना घेण्याचं ठरवलं आहे. रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हा शो संपल्यानंतर कलर्स वाहिनी लगेच 'बिग बॉस'चा नवा सिझन लॉंच करणार आहे. पुढील आठवड्यातच 'खतरों के खिलाडी 12' सुरु होत आहे,त्यामुळे आता बिग बॉसच्या चाहत्यांना शो च्या 16 व्या सिझनची तारीख जाणून घेण्याचे वेध लागले आहेत. आणि सोबतच त्यांना जाणून घ्यायचंय की या सिझनमध्ये नेमकं कोण-कोण असणार आहे. बोललं जात आहे की 16 व्या सिझनमध्ये शायनी आहूजाला (Shiney Ahuja)आणण्यासाठी खास सलमान खान(salman Khan) निमंत्रण देणार आहे.(Shiney Ahuja approached for salman khan led reality show?)

'बिग बॉस 16' ला सुपरहिट बनवण्यासाठी मेकर्स वादग्रस्त सेलिब्रिटींची यादी तयार करण्यात बिझी आहेत. शायनी आहूजाला देखील 'बिग बॉस 16' ची ऑफर गेल्याचं बोललं जात आहे. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार शायनी आहूजानं 'बिग बॉस 16' मध्ये यावं यासाठी तो मागेल ती किंमत द्यायला निर्माते तयार आहेत. पण अद्याप शायनी सोबत बोलणी सुरू आहेत आणि काहीही अंतिम निर्णया पर्यंत पोहोचलेलं नाही. शायनी आहूजानं शो मध्ये येण्यासाठी होकार दिला तर शो च्या निर्मात्यांना आभाळ ठेंगणं वाटेल एवढं निश्चित.

साल २००९ मध्ये शायनी आहूजावर त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्याचसोबत अभिनेत्यावर इतरही गंभीर आरोप लावले गेले होते. दोन वर्षानंतर या प्रकरणात शायनी आहूजाला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर शायनीनं हाय कोर्टात धाव घेतली. व अखेर त्याची जामिनावर सुटका झाली. अभिनेत्यानं सांगितलं होतं की,'हा बलात्कार म्हणता येणार नाही,कारण जे काही झालं ते त्या दोघांच्या संमतीनं झालं होतं'. यानंतर शायनी आहूजाची मोलकरीण देखील आपल्या म्हणण्यावरनं पलटली होती. काहीही असलं तरी यामुळे शायनी आहूजाचं करिअर मात्र बर्बाद झालं. आता पहायचं की शायनी 'बिग बॉस' च्या माध्यमातून पुन्हा मनोरंजन सृष्टीत परत येतोय का नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT