Shraddha Murder Case aftab amin poonawalla took inspiration from dexter tv series to dump body Google
मनोरंजन

Shraddha Murder Case: 'Dexter' सीरिज मध्ये काय होतं? जे पाहून आफताबनं श्रद्धाचे केले 35 तुकडे

दिल्ली येथील श्रद्धा मर्डर केसनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे.

प्रणाली मोरे

Shraddha Murder Case:दिल्ली येथील श्रद्धा मर्डर केसनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. २७ वर्षीय श्रद्धा वायकर हिला तिच्या लिव्ह-इन-पार्टनर आफताब पूनावालानं खूप क्रुरतेनं मारलं. तिच्या मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी आफताबने तिचे ३५ तुकडे केले आणि नंतर पुढील एक आठवडा त्यानं तिच्या शरीराला पॉलिथीन बॅगमध्ये भरण्याचं काम केलं,आणि त्यानंतर दर दिवशी त्यानं एकेक पॉलिथिनची बॅग जंगलात अनेक ठिकाणी लपवत तिच्या बॉडीची अशाप्रकारे विल्हेवाट लावली. (Shraddha Murder Case aftab amin poonawalla took inspiration from dexter tv series to dump body)

पोलिसांच्या तपासा दरम्यान सर्व डिटेल्स एकेक करुन समोर आल्या अन् त्या ऐकल्यावर साऱ्यांचाच थरकाप उडाला. तो भयानक अनुभव ऐकल्यावर आफताब किती हिंसक असेल हे लक्षात येतं. पण प्रश्न हा उठतो की आपल्याच लिव्ह इन पार्टनरला इतक्या क्रुरपणे मारण्याची विकृत आयडिया आफताबला कुठून मिळाली? रिपोर्ट्सनुसार,आफताबने पोलिसांना सांगितले की ही आयडिया त्याला एका प्रसिद्ध अमेरिकन क्राइम सीरिज 'डेस्क्सटर' मधून मिळाली.

या क्राइम सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये हत्या करताना खुनी व्हिक्टिमच्या शरीराचे तुकडे करुन टाकायचा आणि तुकड्यांना काळ्या बॅग्जमध्ये भरुन गाडीमधून आपल्या बोटीपर्यंत घेऊन यायचा. यानंतर तो त्या बॅग्जचे वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये दगड भरुन त्याला सील करायचा आणि नंतर ते समुद्रात फेकून द्यायचा.

आफताबनं पोलिसांना सांगितलं की, त्याला श्रद्धाला गप्प करायचं होतं,पण झटापटीत त्यानं तिचा गळा घोटला. त्यानं हे देखील सांगितलं की श्रद्धाच्या मृतदेहाला स्टोर करण्यासाठी त्यानं एक नवीन फ्रीज खरेदी केला होता आणि पुढचे दोन ते तीन महिने त्यानं त्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महरौलीच्या जंगलात अनेकदा चक्रा मारल्या. रिपोर्टनुसार पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं आहे की आफताबनं पहिल्यांदा श्रद्धाची आतडी काढून त्यांचा बंदोबस्त केला म्हणजे ते लवकर डिकम्पोज व्हावेत.

एप्रिल २०११ मध्ये कॅनडाचा एक फिल्ममेकर मार्क अॅन्ड ट्विचेलला, ३८ वर्षाच्या एका व्यक्तिच्या फर्स्ट डिग्री मर्डर साठी दोषी मानलं गेलं होतं. मार्कने आपल्या व्हिक्टिमची हत्या यापद्धतीनेच केली होती. आणि एका नाल्यात त्या बॉडी पार्ट्सची विल्हेवाट लावली. मार्कची केस कोर्टात सुरु होती तेव्हा एक गोष्ट प्रामुख्यानं नोटीस केली गेली ती म्हणजे डेक्सटर मॉर्गनशी ती केस खूप साधर्म्य साधत होती,ज्यानंतर मीडिया रीपोर्ट्समध्ये त्याला 'द डेक्सटर किलर' म्हणून संबोधलं गेलं. मार्कने डेक्सटर शो सारखाच आपला देखील एक 'किल रूम' बनवला होता.

अशाप्रकारे २०१४ मध्ये देखील डेक्स्टरमधील व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेत एका किशोर वयीन तरुणानं क्राइम केलं होतं. या मुलाने आपल्या १७ वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या खूप भयानक पद्धतीनं केली होती,ज्याच्यासाठी त्याला २५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT