Siddharth Nigam, Tunisha Sharma Google
मनोरंजन

Tunisha Sharma ने आत्महत्येच्या एक दिवस आधी सिद्धार्थ निगमला केलेला व्हिडीओ कॉल.. 'ही' गोष्ट शेअर करत म्हणालेली..

सिद्धार्थ आणि तुनिषा खास मित्र होते. सध्या सिद्धार्थ किसी का भाई किसी की जान सिनेमामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत त्यानं तुनिषाच्या कॉलचा खुलासा केलाय.

प्रणाली मोरे

Tunisha Sharma Suicide Update: 'धूम ३' मधनं चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ निगमनं नंतर छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली. 'अलादीन', 'नाम तो सुना होगा','चंद्र नंदिनी' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट' सारख्या मालिकांमधून त्यानं कामं केली.

'चक्रवर्ती अशोक सम्राट' मध्ये सिद्धार्थ निगमने दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्मासोबत काम केलं होतं आणि त्यादरम्यान त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. सिद्धार्थ निगमनं जेव्हा अचानक तुनिषाच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला होता. तुनिषा शर्मानं २४डिसेंबर २०२२ रोजी टी.व्ही शो 'अली बाबा..' च्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. सिद्धार्थ निगमनं सांगितलं की मृत्यूच्या आधी तुनिषानं त्याला आणि पंजाबी गायक जस्सी गिलला व्हिडीओ कॉल केला होता.

सिद्धार्थ निगमनं सांगितलं की, ''माझ्यासाठी तो क्षण खूपच डिप्रेशनचा होता. मी सिनेमाची शूटिंग करत होतो तेव्हा तुनिषानं जस्सी गिलला व्हिडीओ कॉल केला होता. ते दोघे एकत्र एक म्यूझिक व्हिडीओ करणार होते. मी जवळपास एक वर्षानं तुनिषासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होतो. ती खूपच उत्साही दिसत होती आणि आम्हाला भेटायचा प्लॅन करत होती''.

''दुसऱ्या दिवशी मी जेव्हा वर्कआऊट करायला गेलो होतो तेव्हा मला कॉल आला आणि तुनिषाचं निधन झालं असं सांगण्यात आलं. मला त्यानंतर खूप फोन आले आणि तेव्हा कुठे जाऊन तुनिषा या जगात नाही यावर माझा विश्वास बसला''.(Siddharth Nigam reveal Tunisha Sharma called him before alleged suicide)

सिद्धार्थ निगम पुढे म्हणाला, माझ्या पायाखालून जणू जमिन सरकल्यासारखं झालं तुनिषाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर. खूप वेळा मी विचार करतो की तिनं असं का केलं? तिच्यावर प्रेम करणारी खूप लोकं तिच्या आजुबाजूला होती. पण बोलतात ना आयुष्यात काय कधी होईल सांगू शकत नाही. त्याला दुःखाला आपण शब्दात सांगू नाही शकत.

तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणात तिचा सहकलाकार शीझान खानवर तिच्या आईनं गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी शीझानला ताब्यात घेतले होते. जवळपास अडीच महिन्यांच्या प्रयत्नानंतर शीझानला जामीन मंजूर झाला.

शीझान आणि तुनिषा 'अली बाबा-दास्तान ए काबुल' मध्ये एकत्र काम करत होते. त्यादरम्यान तुनिषाचं शीझानवर प्रेम झालं आणि काही कारणानं त्यांच्यात ब्रेकअपही झालं होतं. रिपोर्ट्सनुसार, ब्रेकअपनंतर तुनिषा खूप चिंताग्रस्त होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT