Sidharth- Kiara Wedding details Google
मनोरंजन

Sidharth- Kiara Wedding: सिद्धार्थ-कियारा 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; डेट,वेन्यू सर्वच माहिती आली समोर

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नव्या वर्षांच्या स्वागतासाठी आबू धाबीला रवाना झाले आहेत.

प्रणाली मोरे

Sidharth- Kiara Wedding: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. हंसिका मोटवानी नंतर आता नव्या वर्षात बॉलीवूडमधील एक क्यूट कपल लग्न बंधनात अडकणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बी-टाउनचे लव्ह बर्ड्स मानले जातात. ते अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट केले जातात. त्यांचा लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अशी कन्फर्म माहिती समोर येत आहे की दोघे 2023 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.(Sidharth- Kiara Wedding details)

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​ ६ फेब्रुवारीला जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये सात फेरे घेणार आहेत. ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत, ज्यामध्ये मेहंदी, हळदी आणि संगीत सारखे समारंभ होतील.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 'शेरशाह' चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या चित्रपटात दोघांच्या अभिनयासोबतच चाहत्यांना केमिस्ट्रीही खूप आवडली. यानंतर सिद्धार्थ आणि कियारा अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत.अलीकडेच दोघेही मनीष मल्होत्राच्या पार्टीतही एकत्र पोज देताना दिसले.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या आगामी 'मिशन मजनू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये सिद्धार्थसोबत 'पुष्पा: द राइज' फेम रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. हा चित्रपट 20 जानेवारीपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम केला जाईल.

त्याचवेळी कियारा अडवाणी शेवटची 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत काम केले होते. आता कियाराचा 'RC 15' (RC15) चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती राम चरणसोबत स्क्रीन शेअर करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

Pune Crime : बाजीराव रस्त्यावर भरदिवसा थरार; तरुणाचा कुकरीने वार करून खून

'ठरलं तर मग' मध्ये अखेर अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री; 'हा' अभिनेता साकारतोय सुभेदारांच्या जावयाची भूमिका, चेहरा समोर

SCROLL FOR NEXT