Sidharth Shukla Mother esakal
मनोरंजन

Sidharth Shukla Mother: 'माझ्या मुलामुळेच...', सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याच्या आईचा व्हिडिओ समोर

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही मनोरंजन विश्वातला प्रसिद्ध चेहरा आणि 'बिग बॉस 13'चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन होऊन आता 2 वर्षांहून अधिक काळ लोटला गेला आहे, त्याच्या चाहत्यांना नेहमी त्याची आठवण येते. त्याच्या मृत्यूनंतर चाहते सिद्धार्थची आई रिटा यांची पूर्ण काळजी घेतात.

जेव्हाही त्याचा फोटो येतो तेव्हा त्याची अवस्था आणि त्याच्या डोळ्यात दडलेले दुःख पाहून चाहतेही भावूक होतात. आता त्यांचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातुन त्यांनी सिद्धार्थच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्या सिद्धार्थबद्दल असं काही बोलल्या आहेत की जे सर्वांच्या हृदयाला भिडलं आहे.

व्हिडीओ बनवणारी महिला रीटा यांना विचारते, तुम्हाला काही बोलायचे आहे का? यावर सिद्धार्थ शुक्लाची आई म्हणते, 'मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते . मला तुमचे संदेश मिळत असतात आणि मला खूप बरं वाटतं की लोक माझ्यावर प्रेम करतात आणि याचं कारण फक्त सिद्धार्थ शुक्ला आहे. हे सांगितल्यानंतर त्या हसतात, पण चाहत्यांना त्याच्या हसण्यामागे दडलेल्या वेदना जाणवत आहेत.

सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर 2021ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो फक्त 40 वर्षांचे होते. 'बिग बॉस 13' चा विजेता झाल्यानंतर तो यशाच्या शिखरावर होता. वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम करत होता. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT