Simi Garewal shares hilarious unseen footage from Amitabh Bachchan’s interview from her show Instagram
मनोरंजन

Amitabh Bachchan: 'मी इशारा करीन तेव्हा...', सिम्मी गरेवालनी शेअर केला अमिताभचा 'तो' भन्नाट व्हिडीओ

2004 सालामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन, अभिषेक तसंच मुलगी श्वेतासह सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये हजेरी लावली होती.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan:अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी त्यांच्या शो मधील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिमी यांचा चॅट शो एकेकाळी चांगलाच लोकप्रिय होता. या शोमध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या शोमधील 2004 सालातील बिग बी अमिताभ बच्चन यांचा संपूर्ण कुटुंबासहचा एक व्हिडिओ सीमी गरेवाल यांनी पोस्ट केला आहे. 2004 सालामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन, अभिषेक तसंच मुलगी श्वेतासह सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये हजेरी लावली होती. याच एपिसोडमधील पडद्यामागचे काही भन्नाट क्षण या व्हिडिओमध्ये आहेत.(Simi Garewal shares hilarious unseen footage from Amitabh Bachchan’s interview from her show)

या व्हिडिओत सिमी बच्चन कुटुंबियांना शो सुरू असताना संपूर्ण वेळ त्यांच्यावर कॅमेरे असतील हे सांगत आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा कॅमेरा कोणता असेल हे विचारलं आणि कॅमेरामनला काही सूचना दिल्या. "मी टिचकी वाजवून इशारा केला की माझा कॅमेरा बंद करा कदाचित मला नाक खाजवायच असेल किंवा मी हाताने इशारा करेन तेव्हा कॅमेरा बंद करा समजा मला दाढी खाजवायची आहे" असं बिग बी म्हणत आहेत.

तर पुढे या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन आळस देताना दिसत आहे. सिमी यांच्या या शोमध्ये संपूर्ण बच्चन कुटुंबाने धमाल केली असल्याचं पडद्यामागच्या या क्षणांमधून स्पष्ट दिसून येतंय. यापूर्वी देखील सिमी यांनी या एपिसोडमधील एक खास व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात जया बच्चन बिग बींच्या दाढीवरून मस्करी करताना दिसत आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'ऊंचाई' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात ते अभिनेते अनुपम खेर, बोमन इराणी यांच्यासोबत एका रोमांचक सफरीच्या कथेमध्ये झळकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT