Rakhi Sawant, Mika Singh Instagram
मनोरंजन

Rakhi Sawant ला 17 वर्षापूर्वी केलेलं किस मिकाला अजूनही सतावतंय..गायक या प्रकरणात पुन्हा पोहोचला हाय कोर्टात..

मिका सिंगनं आपल्या वाढदिवासाच्या पार्टीत राखी सावंतला तिच्या मर्जी व्यतिरिक्त किस केलं होतं, ज्यानंतर गायकाविरोधात केस दाखल झाली होती.

प्रणाली मोरे

Rakhi Sawant: राखी सावंत आणि गायक मिका सिंग हे दोघेही इंडस्ट्रीतले चर्चेतले चेहरे. या दोघांचे किसिंग प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण मिका सिंगनं आता मुंबई हाय कोर्टाकडे दाद मागितली आहे.

राखी सावंतला जबरदस्ती किस केल्याप्रकरणा संदर्भातील केस त्याला आता रद्द करायची आहे. मिकानं या याचिकेत दावा केला आहे की २००६ मध्येच या केसला रद्द केले जाऊ शकत होते कारण या प्रकरणातील आरोपी आणि तक्रारकर्ता असलेल्या दोघांनी हे प्रकरण आपापसात बोलून सोडवले आहे.

ही याचिका सोमवारी १० एप्रिलला न्यायमूर्ती ए.एस.गडकरी आणि न्यायमूर्ती पी.डी.नाईक च्या खंडपीठा समोर सुनावणीसाठी आली. राखी सावंतचे वकील आयुष पासबोला यांनी कोर्टाला सांगितलं की एफआयआर रद्द करण्यासंबंधित एक अॅफिडेविट सादर करण्यात आलं होतं

पण हायकोर्टाच्या रजिस्टर विभागात ते कुठेतरी हरवलं, त्यामुळे त्यासंबंधी काहीच पुढे सुगावा लागला नाही. खंडपीठानं त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा अॅफिडेविट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.(Singer mika singh approach bombay high court to quash fir against him by actor rakhi sawant)

तर मिका सिंगची वकील फाल्गुनी ब्रह्मभटने सांगितलं की हे प्रकरण गेल्या १७ वर्षापासून मार्गी लागलेलं नाही. त्या म्हणाल्या,''गायक मिका सिंगच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं गेलं आहे ,पण आरोप निश्चित करणं बाकी आहे''. त्या म्हणाल्या, ''मिका सिंग आणि राखी सावंत दोघेही ती गोष्ट आता विसरले आहेत आणि दोघांनी आपापसात ते प्रकरण समजूतदारपणा दाखवत सोडवलं आहे''.

काय होतं प्रकरण?

माहितीसाठी इथं सांगतो, २००६ मध्ये आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत मिकानं कॅमेऱ्यासमोर राखी सावंतला तिच्या मर्जी व्यतिरिक्त किस केलं होतं. त्यानंतर राखीनं मिकावर तिला छेडल्याचे आरोप केले होते आणि या प्रकरणात त्याला पकडलं देखील गेलं होतं. त्यानंतर जामिनावर मिकाला सोडण्यात आलं होतं. आता दोघांनी हे प्रकरण आपापसात सोडवल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT