Singer Shubh Promote Hoodie Mocking Indira Gandhi’s Assassination During London Concert? know the truth SAKAL
मनोरंजन

Singer Shubh: वादग्रस्त गायक शुभने इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचं समर्थन केलं? कंगना रणौत संतापत म्हणाली...

वादग्रस्त गायक शुभचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली

Devendra Jadhav

Singer Shubh News: आज भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन. परंतु आजच्या दिवशी एक अशी घटना घडलीय जी चर्चेत आहे.

पंजाबी-कॅनेडियन गायक आणि रॅपर शुभनीत सिंग, ज्याला शुभ नावाने ओळखले जाते. लंडनमधील नुकत्याच झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची खिल्ली उडवण्याचा आरोप केल्याची चर्चा आहे.

(Singer Shubh Promote Hoodie Mocking Indira Gandhi’s Assassination During London Concert? know the truth)

SherePanjabUK नावाच्या प्रो-खलिस्तानी हँडलने एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर केला होता, या व्हिडिओला कॅप्शन दिले गेले की, "पंजाबी कलाकार शुभने एक फोटो असलेली हुडी धारण केली. या फोटोत भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी याशिवाय त्यांचे मारेकरी भाई सतवंत सिंग आणि भाई बेअंत सिंग यांचं चित्रण आहे."

इंदिरा गांधींच्या हत्येची खिल्ली उडवली आणि मारेकऱ्यांचं समर्थन केल्याप्रकरणी गायक शुभवर चहूबाजूंनी टिका होत आहे.

कंगना रणौतने सुद्धा शुभचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत लिहीलंय की, इंदिरा गांधींनी ज्यांना त्यांचं बॉडीगार्ड म्हणुन नियुक्त केलेलं त्यांनीच त्यांची हत्या केली. आणि या घटनेचं समर्थन करणाऱ्या गायकाचा निषेध.

जेव्हा तुमच्यावर संरक्षण करण्याचा विश्वास ठेवला जातो, परंतु तुम्ही विश्वास आणि विश्वासाचा फायदा घेत त्याच शस्त्रांचा वापर करता ज्यांच्या साहाय्याने रक्षण करायचे होते, तेव्हा हे शौर्याचे नव्हे तर भ्याडपणाचे लज्जास्पद कृत्य आहे.

नि:शस्त्र आणि अनभिज्ञ असलेल्या इंदिरा गांधींवर अशा भ्याड हल्ल्याची लाज वाटली पाहिजे, लोकशाहीच्या माध्यमातुन निवडलेल्या इंदिरा गांधींचा शुभने गौरव करायला हवा. पण त्याने तसे काहीही केले नाही. लाज वाटली पाहिजे!!!

शुभने इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचं समर्थन केलं? काय आहे सत्य

गायक शुभला व्हिडीओ व्हायरल झाल्यावर. OpIndia ने केलेल्या तथ्य तपासणीनुसार. त्याने स्टेजवर फ्लॅश केलेल्या हुडीमध्ये इंदिरा गांधींचे चित्रण नव्हते. त्याऐवजी त्यावर फक्त पंजाबचा नकाशा होता. याशिवाय जिल्हे स्पष्टपणे दिले आहेत.

त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडीओत कोणीतरी डुप्लिकेट हुडी चिकटवली आहे. शुभच्या हातातली हुडी आणि डुप्लिकेट हुडी बऱ्यापैकी सारखी आहे.

हुडी बनवणाऱ्या अकाल क्लोदिंग नावाच्या ब्रँडने शुभचा व्हिडिओ त्यांच्या उत्पादनांची खोटी जाहिरात करण्यासाठी वापरला जात असल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची बिग बॉसमध्ये एंट्री

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT