Sohail Khan Google
मनोरंजन

Sohail Khan:'खान' कुटुंबाला शोभेल असं काम केलं सोहेलनं..', व्हिडीओ पाहून लोकांनी म्हटलं,'वाह भाई वाह..

भर रस्त्यात सोहल खान एका महिलेच्या मदतीसाठी धावून गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Sohail Khan: असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत जे त्यांच्या चाहत्यांना आणि सामान्य लोकांना मदत करण्यासाठी ओळखले जातात. सध्या सलमान खानचा भाऊ सोहेल खान देखील एका महिलेला मदत केल्यामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तरीही तो अनेकदा चर्चेत असतो नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो गर्दीच्या मध्ये रस्त्यावर पडलेल्या महिलेला मदत करताना दिसत आहे.(Sohail Khan came forward to help a woman who fell on the road)

सोहेल खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सोहेल खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तो महिलेला जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणते, 'तुम्ही कसे उचलणार? फक्त पाय...' व्हिडिओमध्ये सोहेल खान इतरांच्या मदतीनं महिलेला उचलताना दिसत आहे.

सोहेल खानच्या चाहत्यांसह सर्व सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने त्याच्या कमेंटमध्ये लिहिले की, 'सोहेल खान विथ गोल्डन हार्ट.' दुसऱ्याने लिहिले, 'तो खूप चांगल्या मनाचा माणूस आहे.'

" सोहेल किती दयाळू व्यक्ती' याशिवाय इतरही अनेक चाहत्यांनी कमेंट करून सोहेल खानचे कौतुक केले आहे.

सोहेल खान मुख्य अभिनेता म्हणून बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. तो शेवटचा 2017 मध्ये आलेल्या 'ट्यूबलाइट' चित्रपटात दिसला होता. तेव्हापासून तो मोठ्या पडद्यावर त्याचं दर्शन झालेलंं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT