sooraj pancholi used to torture jiah khan physically and mentally-Jiah Khan Mother Google
मनोरंजन

मृत जिया खानच्या आईचा सूरज पंचोलीवर घणाघात; म्हणाली,'माझ्या मुलीवर तो...'

विशेष न्यायालयात जिया खानची आई राबिया खान यांनी आपली साक्ष नोंदवली आहे. त्यात सूरज पंचोलीवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

प्रणाली मोरे

Jiah Khan case: २०१३ मध्ये आत्महत्या(Suicide) करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री(Bollywood Actress) जिया खानची आई राबिया खाननं बुधवरी विशेष न्यायालयात सूरज पंचोलीवर(Sooraj Pancholi) गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या मुलीची पूर्ण कहाणी,तिचं यश,करिअर आणि रिलेशनशीप याविषयी सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या. राबिया खान म्हणाल्या,''सूरज पंचोली त्यांच्या मुलीवर शारिरीक आणि मानिसक अत्याचार करत होता''. जिया खान २०१३ मध्ये सूरज पंचोली सोबत रिलेशनशीपमध्ये होती. त्याच्यावर जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप लावला गेला होता. या केस प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोलीला अनेक दिवस जेलमध्ये देखील राहावं लागलं आहे. याप्रकरणात सीबीआयचा तपास अद्याप सुरु आहे. सूरज पंचोली सध्या जामिनावर बाहेर आहे.(sooraj pancholi used to torture jiah khan physically and mentally-Jiah Khan Mother)

बुधवारी १७ ऑगस्ट रोजी, जिया खानची आई राबिया खानने विशेष न्यायाधीश ए.एस.सैय्यद यांच्यासमोर या प्रकरणात आपली साक्ष नोंदवली आहे. त्यांनी विशेष न्यायालयात बॉलीवूडमध्ये जियाचं पदार्पण,तिचं करियर,यश आणि सूरज पंचोली सोबतचे तिचे रिलेशन या सर्व गोष्टींविषयी माहिती दिली आहे.

त्या म्हणाल्या,''सूरज पंचोलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जियाला संपर्क साधला, तिच्यावर भेटण्यासाठी दबाव आणला. सुरुवातील जिया त्याला भेटण्यासाठी थोडी साशंक होती आणि इच्छुकही नव्हती. पण दोघं पहिल्यांदा सप्टेंबर,२०१२ मध्ये भेटले''.

राबिया खान यांनी न्यायालयात म्हटलं की,''त्यावेळी जियाने मला काही फोटो पाठवले होते. मला वाटलं की तिनेच स्वतःहून हे फोटो काढले आहेत आणि ते दोघं एकमेकांना पसंत करू लागले आहेत. पण सप्टेंबरमध्ये जियाने मला म्हटलं की ते फक्त मित्र आहेत. जियाची आई म्हणाली की सूरज पंचोलीनं त्यांच्या मुलीचं रोजचं जगणं देखील मुश्किल केलं होतं. ऑक्टोबर २०१२ मध्ये दोघं एकमेकांच्या घरी जाऊन राहायचे. त्यावर्षी लंडनमध्ये आपल्या घरी आलेली जिया खूप आनंदात दिसत होती,पण...''.

राबिया खान यांनी न्यायालयात सांगितलं की,''जिया कामाच्या निमित्तानं मुंबईत परतली आणि नंतर ती ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनला येणार होती,पण ती आलीच नाही. जियाच्या आईच्या मते २४ डिसेंबर,२०१२ ला जियाला पंचोलीनं एक मेसेज केला,ज्यात लिहिलं होतं की,''एका मित्राशी वाद झाल्याचा राग त्यानं जियावर काढला आणि तिच्यावर नाराज झाला पण तिनं त्याला माफ करावं आणि आणखी एक संधी द्यावी''.

राबिया खान म्हणाल्या,''तेव्हा मला कळालं की जिया आणि सूरजमध्ये मोठं भांडण झालेलं होतं. ज्यानं हिंसक वळही घेतलं. जिया खाननं त्यानंतरही सूरजला एक संधी देण्याचा विचार केला. त्यानंतर ते दोघे गोव्याला गेले. पण तिथून तिनं मला एक कॉल केला ज्यात तिनं ती एका विचित्र ठिकाणी असल्याची तक्रार केली, आणि मला इथे थांबायचं नाही'', असं म्हणाली.

राबिया खान यांनी आपली मुलगी जिया खान हिच्याशी झालेल्या संवादाचा दाखला देत सूरज पंचोली गोव्यात इतर मित्रांसमोर जियाचा सतत अपमान करायचा,आणि तिच्यासमोर दुसऱ्या मुलींशी फ्लर्ट करायचा असं म्हटलेलं आहे. त्या म्हणाल्या की जिया अचानक १४ फेब्रुवारी,२०१३ ला लंडनला पोहोचली,तेव्हा खूप उदास होती.

राबिया खान यांच्या मते जियाने त्यांना सांगितलं होतं की पंचोली जियावर शारिरीक आणि मानसिक अत्याचार करायचा. खूप गलिच्छ भाषा तिच्याशी बोलताना वापरायचा.राबिया खानची साक्ष उद्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी जारी केली जाईल. राबिया यांच्या मते हिंदी सिनेमा 'निःशब्द' मधील अभिनयामुळे चर्चेत आलेली जिया खान ३ जून,२०१३ मध्ये मुंबईतील आपल्या निवासस्थानी फासाला लटकलेल्या अवस्थेत सापडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT