Sooryavanshi official trailer released today  
मनोरंजन

Sooryavanshi Trailer : 'आ रही है पोलिस' म्हणत सूर्यवंशी, सिंघम, सिंबाचा दंगा

वृत्तसंस्था

गेली काही दिवसांत चर्चा आहे ती फक्त 'सूर्यवंशी' चित्रपटाची. अक्षय कुमार, अजय देवगण रणवीर सिंग या तिघांचा अभिनय आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन म्हणजे आणखी काही सांगायलाच नको! आज अखेर बहुप्रतिक्षीत 'सूर्यवंशी'चा ट्रेलर रिलीज झाला आणि काही क्षणात या भन्नाट ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पोलिस आ रही है' सूर्यवंशी, सिंघम आणि सिंबा यांनी ट्रेलरमध्ये हवा केली आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार असे समजताच डिसीपी वीर सूर्यवंशी या हल्ल्याची माहिती व शोध घ्यायला सुरू करतो. या हल्ल्याची तयारी कुठे सुरू आहे, कोण कोण यात सहभागी आहे, मागील दहशतवादी हल्ल्यांचा या हल्ल्याशी काय संबंध असा सर्व प्रकारचा शोध घ्यायला सूर्यवंशी बाहेर पडतो. मुंबईवर खूप मोठ व भायनक हल्ला होणार याची खात्री झाल्यावर तो सिंघम (अजय देवगण), संग्राम भालेराव अर्थात सिंबा (रणवीर सिंग) यांना बोलवतो व तिघंच जण मिळून दहशतवाद्यांचा खात्मा करतात. 

सूर्यवंशीमध्ये प्रमुख नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ आहे. तिने अक्षयला भक्कम साथ देत पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. याशिवाय जॅकी श्रॉफ, जावेद जाफ्री यांच्या मुख्य भूमिका सूर्यवंशीमध्ये आहेत.

रोहित शेट्टीचे दिग्दर्शन, करण जोहरची निर्मिती आहे. संवादाचे परिणाम ट्रेलरमध्ये हवा तेवढा दिसत नसला तरी चित्रपटात संवाद टाळ्या मिळवतील अशी आशा आहे. २४ मार्चला सूर्यवंशी रिलीज होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT