South Movie Stuntman s suresh dies on the sets of vijay sethupathi film viduthalai  Google
मनोरंजन

Vijay Sethupathi: विजय सेतुपतिच्या सिनेमाच्या सेटवर स्टंटमॅनचा मृत्यू, क्रेनला बांधलेल्या रशीनं केला घात

'विदुथलाई' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान स्टंटमॅन मास्टर सुरेशचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

प्रणाली मोरे

Vijay Sethupathi: विजय सेतुपतिचा आगामी सिनेमा 'विदुथलाई'च्या शूटिंग दरम्यान ५४ वर्षीय स्ंटटमन मास्टर सुरेशचा अपघाती मृत्यू झाला आहे. वंडालूर मध्ये विदुथलाईच्या शूटिंग दरम्यान दिवंगत स्टंट मास्टर २० फूट उंचीवरनं खाली पडला आहे. हा अपघात सिनेमाच्या सेटवरच झाला आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरेश हा मुख्य स्टंट मास्टरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता.(South Movie Stuntman s suresh dies on the sets of vijay sethupathi film viduthalai)

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार स्टंट मास्टर एस. सुरेशला एक स्टंट करायचा होता,ज्यामध्ये तो २० फूट उंचीवरनं उडी मारणार होता. पण त्याचं दुर्भाग्य की क्रेनला रशीनं बांधलेलं असून सुद्धा ती तुटल्या कारणानं सुरेश एवढ्या उंचावरनं खाली पडला. त्याला खाजगी रुग्णालयात त्वरीत दाखल केलं गेलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सेटवर झालेल्या या अपघाताविषयी माहिती झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरेश २५ वर्ष इंडस्ट्रीत काम करत होता. करिअरच्या सुरुवातीपासनंच त्यानं स्टंट मॅन म्हणून काम सुरू केलं होतं. 'विदुथलाई' सिनेमात विजय सेतुपति मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं शूटिंग दोन भागात होणार आहे. सध्यातरी सेटवर हा मोठा अपघात झाल्या कारणानं सिनेमाचे शूटिंग बंद ठेवलं आहे. विजय सेतुपतिने सिनेमाच्या सेटवरील कितीतरी फोटो हा अपघात होण्याआधी आपल्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केले होते.

विजयनं याआधी सांगितलं होतं की सिनेमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग संपलं आहे. तर दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरु आहे. याच दुसऱ्या भागाच्या सेटवर स्टंटमनचा अपघाती मृत्यू झाला. विदुथलाईमध्ये विजयचा एक एक्सटेंडेट कॅमियो असणार आहे. क्राइम थ्रिलर जॉनरच्या या सिनेमात सूरी आणि विजय सोबतच प्रकाश राज,गौतम मेनन,किशोर,भावानी श्री,राजीव मेनन,चेतन सारखे स्टार्स असणार आहेत. सिनेमातील बहुतेक सीन हे सत्यमंगलमच्या जंगलात शूट केले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT