shanaya11
shanaya11 
मनोरंजन

खास मुलाखत : परतलेली शनाया असणार सरप्राईज पॅकेज; अभिनेत्री रसिका सुनिलचे कमबॅक... 

संतोष भिंगार्डे

मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. अॅक्टिंग करावी, मॉडेलिंग करावे, चित्रपटसृष्टीत यावे असे काही माझ्या मनात नव्हते. लहानपणापासून माझा संपूर्ण फोकस गाण्यावरच होता आणि  आणि गाण्यामध्ये काही तरी करावे असे मला वाटत होते. मात्र अकरावी-बारावीत जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिकत असताना नाटकांमध्ये काम करू लागले. तेव्हा माझ्या मनात अॅक्टिंगबद्दल हळूहळू ओढ निर्माण झाली.

त्यातच राज्य नाट्य स्पर्धेत मला लव आज कल या नाटकाला बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मी नाटकांमध्येच काम करू लागले. पहिल्यांदा मी स्क्रीनवर काम केले ते लक्स झकास हिरॉईन स्पर्धेत. त्याच वेळेला पोश्टर गर्ल या चित्रपटातील एक लावणी केली. फुलवा ताईनी (फुलवा खामकर) ही लावणी कोरिओग्रफ केली होती. एका रात्रीत ती चित्रित झाली होती आणि त्याच दरम्यान मला बसस्टॉप या चित्रपटाची ऑफर आली. बसस्टॉप तसेच बघतोस काय मुजरा कर हे चित्रपट केले आणि एके दिवशी मला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेची ऑफर आली.

कॅमेऱ्याचा पहिला सामना करताना माझ्या मनात कमालीची धाकधूक होती. मनात भीतीदेखील वाटली होती. थोडीशी नव्हर्स मी होते. पण मला सगळ्यांनी चांगले सहकार्य केले. बसस्टॉप हा सिनेमा समीर जोशी यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट मल्टिस्टारर होता आणि यातील माझी भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती. पोश्टर गर्लमध्ये लावणी केल्यामुळे अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे आदी कलाकारांना ओळखत होते. त्यामुळे बसस्टॉप करताना खूप सहजता वाटली. अधिक टेन्शन वगैरे आले नाही आणि तीच बाब पुढे बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाच्या वेळेला आली. सगळ्यांनी सहकार्य केले आणि मला खूप सांभाळून घेतले. या चित्रपटांतील कलाकारांकडून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. चित्रपट माध्यम काय असते आणि त्याचे कामकाज कसे चालते या बाबी तेथे पाहता आल्या. बसस्टॉप माझी पहिली फिल्म. परंतु रीलीज पहिला झाला बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट. या दोन्ही चित्रपटांसाठी मला ऑडिशन्स द्याव्या लागल्या. चित्रपट करीत असतानाच मला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेची ऑफर आली. मी या मालिकेतील शनायाच्या भूमिकेसाठी मी आडिशन्स दिली.

त्यानंतर ही भूमिका करायची की नाही याबाबत वेगवेगळे विचार मनात येत होते. एक्झिक्युटिव्ह निर्माती सुवर्णा आणि माझी दोनेक महिने चर्चा सुरू होती आणि त्यातून फायनल झाले व शूटिंगच्या पाचव्या दिवशी मी सेटवर होते. शनाया ही स्पष्टवक्ती आहे. तिच्या मनात काहीही नाही. तिला जे काही करायचे आहे ते चूक की बरोबर याचा विचार न करता ती करते. फार आयडियल बनायला जात नाही. चुलबुली आणि बबली अशी ही भूमिका आहे. काही चुकी ती करते खरी. पण रडत बसत नाही आणि कुणी काही म्हटले तरी ही भूमिका रसिकांना आवडत आहे. मला या भूमिकेने बरेच काही दिले आहे. आता या शनायाला आपल्या चुका कळलेल्या आहेत आणि आता पुढे ती काय काय करील हे प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज आहे.

साधारण दोन वर्षे मी या मालिकेपासून दूर होते. अमेरिकेत फिल्म मेकिंगचा कोर्स करण्यासाठी गेले होते. तेथे मी काही शॉर्टफिल्मदेखील बनविल्या आहेत आणि आता पुन्हा शनायाच्या भूमिकेद्वारे कमबॅक करीत आहे. दोन वर्षांनी पुन्हा तीच भूमिका करताना काही अवघड आणि कठीण वाटले नाही. कारण संपूर्ण युनिट ओळखीचे आहे. अभिजित खांडकेकर, अमिता दाते, दिग्दर्शक केदार वैद्य अशी सगळीच माणसे छान आहेत. जेव्हा मी येथे नव्हते तेव्हादेखील आमचे बोलणे व्हायचे. कधी भारतात आले तर मी या मालिकेच्या सेटवर जायचे आणि सगळ्यांशी गप्पा मारायचे. आमची छान मैत्री आहे आणि या सगळ्यांचे वारंवार सहकार्य मिळत आहे. सध्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे खरे. पण आम्ही सेटवर खूप काळजी घेतलेली आहे. मी स्वतःहून काही या मालिकेत पुन्हा आली नाही. हा सर्वस्वी निर्णय चॅनेलचा व प्रॉडक्शन हाऊसचा आहे. 

मला त्यांनी फोन केला आणि मी पुन्हा या मालिकेत आले आहे. खरं तर काही महिलांच्या मनात शनायाबद्दल राग होता...ही गुरूनाथचा संसार का मोडतेय असे काहींना वाटत होते. पण आता शनाया पूर्णपणे बदललेली दिसेल. पण हा बदल कसा असेल हे मलाही माहीत नाही. त्याबाबतीत मीदेखील उत्सुक आहे. प्रेक्षकांनी शनायावर भरभरून प्रेम केले आणि यापुढेही करतील अशी मला खात्री आहे. खरे तर शनायाची भूमिका अगदी सुरुवातीला साकारताना मी पूर्णपणे दिग्दर्शक केदार वैद्य यांच्यावर अवलंबून होते. ते सांगतील त्याप्रमाणे अभिनय करीत होते. पण नंतर नंतर मला या भूमिकेतील काही बारकावे कळायला लागले आणि मी माझे काही इनपूटस त्यामध्ये टाकले.

आता मी अॅक्टिंग करीत आहे आणि अॅक्टिंगमध्येच करिअर करायचे जरी ठरविले असले तरी माझी गाण्याची आवड काही मागे पडली आहे असे मला वाटत नाही. माझा दररोज रियाज चालू असतो. कधी इंडस्ट्रीतील कुणाला गाण्यांच्या ओळी लिहून हव्या असल्या तर मी त्या पाठविते तसेच म्युझिक इंडस्ट्रीतील काही मित्रमंडळींनी एखादा गाण्याचा ट्रॅक मला पाठविला तर मी तो गाऊन पाठविते. संगीतामध्ये मी विशारद आहे आणि अभिनयाबरोबरच मी गाणेही सुरूच ठेवणार आहे. एक सिंगल तयार आहे. पुढील महिन्यात ते गाणे येईल.  

स्ट्रगल हा सगळ्याच क्षेत्रात आहे आणि तुम्ही त्याला कसे सामोरे जाता हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला स्ट्र्गल हा करावाच लागतो. मला माझ्या आई-बाबांनी नेहमीच सहकार्य केले. कधी कोणत्या गोष्टीला मला त्यांनी विरोध केला नाही. आई-बाबांबरोबरच दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, केदार वैद्य, दीपक सरोदे, हेमंत ढोमे, समीर जोशी अशा कित्येक मंडळींनी मला सहकार्य केले आहे. मराठीमध्ये कुणी स्मिता पाटील यांची बायोपिक बनविली तर त्यामध्ये मला त्यामध्ये काम करायला नक्कीच आवडेल. मराठीबरोबरच हिंदी चित्रपट आणि वेबसीरीज या नवीन प्लॅटफॉर्ममध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल.
---
(संपादन : ऋषिराज तायडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT