Sridevi birth anniversary:when Rajesh khanna,Jeetendra locked Sridevi and Jayaprada in makeup room for 2 hours Google
मनोरंजन

श्रीदेवी-जयाप्रदा यांना एकाच खोलीत केलेलं बंद, २ तासांनी दरवाजा उघडला तर...

श्रीदेवी-जयाप्रदा ८० च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्याच, पण यांच्यातील वैरही त्या काळात पुष्कळ गाजलं होतं.

प्रणाली मोरे

Sridevi birth anniversary: बॉलीवूडमध्ये मैत्रीचे,प्रेमाचे,कलाकारांमधील खडाजंगीचे असे अनेक किस्से आहे. आणि हे पूर्वपारंपार चालत आलेलं आहे. आणि अशा अनेक जोड्या सांगता येतील कलाकारांच्या ज्यांच्यात मैत्री,शत्रूत्व होतं,आहे. यातील एकमेकांचे शत्रू असलेल्या सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये जयाप्रदा(Jayaprada) आणि श्रीदेवी (Sridevi) देखील सामिल होत्या. दोघीही ८० च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्री. आणि हेच कारण होतं की दोघी एकमेकींना डोळ्यासमोर पाहणं देखील पसंत करत नव्हत्या. (Sridevi birth anniversary:when Rajesh khanna,Jeetendra locked Sridevi and Jayaprada in makeup room for 2 hours)

दोघींनी एकत्र कितीतरी सिनेमे केले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती. पण कॅमेऱ्याच्या मागे दोघी एकमेकींकडे पाहतही नव्हत्या अशी माहिती आहे. एकदा राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी एका खोलीत दोघींना बंद केलं होतं,म्हणजे दोघी आपल्यातला वाद विसरतील. पण यामुळे झालं उलट,चला सविस्तर जाणून घेऊया.

१९८० च्या दशकात श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यात मोठं शत्रूत्व होतं. दोघीही साऊथ मधनं होत्या. एकाच वयाच्या होत्या. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत दोघी पहिल्या नंबरवर विराजमान झाल्या होत्या. दोघींची ऑनस्क्रीन केमिस्ट्रूी खूपच भन्नाट होती,आणि हेच कारण होतं की दिग्दर्शक त्या दोघींना एकत्र कास्ट करणं पसंत करायचे, पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र दोघी एकमेकींकडे ढुंकूनही पहायच्या नाहीत.

१९८४ ची ही गोष्ट. 'मकसद' सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. जितेंद्र आणि राजेश खन्ना दोघांनी मिळून जयाप्रदा आणि श्रीदेवी यांना एकाच मेकरुम मध्ये लॉक केलं. त्यांना आशा होती की दोघींचं पॅचअप होईल पण झालं मात्र उलट. २ तासानंतर जेव्हा दरवाजा खोलला तेव्हा दोघी एकमेकींकडे पाठ करुन बसल्या होत्या,आणि संपूर्ण खोलीत भयाण शांतता पसरली होती.

बोललं जातं की श्रीदेवींचे असे दोन हिट सिनेमे ज्यांच्यासाठी खरंतर दिग्दर्शकाची पहिली पसंत त्या नव्हत्याच. हे सिनेमे होते-'चांदनी' आणि 'नगीना'. बोललं जातं की १९८६ मध्ये रिलीज झालेल्या 'नगीना' मध्ये पहिल्यांदा जयाप्रदा यांना कास्ट करण्याचा विचार होता. तर 'चांदनी' मध्ये रेखा पहिली पसंत होत्या. त्या सिनेमात काम करायला तयारही झालेल्या,पण बातचीत पुढे सरकली नाही.

पण जसा-जसा काळ पुढे सरकत गेला, जया बच्चन आणि श्रीदेवी यांच्यातील वाद कमी होत गेला. दोघीही हळूहळू आपल्या कामात,कुटुंबात व्यस्त झाल्या. जयाप्रदा तर पुढे राजकारणात गेल्या. त्यामुळे दोघींमध्ये सिल्व्हर स्क्रीनवर स्पर्धा उरलीच नाही. १९८८ ते २०१८ पर्यंत त्या संपर्कात मात्र कायम राहिल्या. २०१५ सालाविषयी बोलायचं झालं तर,श्रीदेवी जयाप्रदा यांच्या भाच्याच्या लग्नात सामिल झाल्या होत्या.

Sridevi birth anniversary, Memory with Jayaprada

श्रीदेवी आणि जयाप्रदा यांनी एकत्र 'मकसद','औलाद',' मै तेरा दुश्मन' मध्ये एकत्र काम केलं होतं. २०१८ मध्ये जेव्हा श्रीदेवी यांचं अचानक निधन झालं तेव्हा जयाप्रदा यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी याला 'वाईट स्वप्न' असं म्हटलं होतं. या दुःखद प्रसंगी जयाप्रदा श्रीदेवी यांच्या कुटुंबासोबत उभ्या राहिलेल्या दिसल्या.

Sridevi birth anniversary, Memory with Jayaprada

२०१८ मध्ये श्रीदेवी यांचे दुबईतील एका हॉटेलात निधन झाले होते. त्या तिथे आपल्या कुटुंबातील एका लग्नास उपस्थित राहण्याठी गेल्या होत्या. हॉटेल रुममधील बाथटब मध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. आणि त्यांचा मृत्यू त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT