mi honar superstar chhote ustad sakal
मनोरंजन

या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा महाअंतिम सोहळा

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या सांगीतिक रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा ८ मे रोजी होणार आहे.

नीलेश अडसूळ

प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीने असाच एक मंच उभारला तो म्हणजे, ''मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद''. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या सांगीतिक कार्यक्रमामुळे गेली काही महिने महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला आहे. ( mi honar superstar chhote ustad grand finale on 8 may )

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यातील ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या ८ मेला पाहायला मिळणार आहे. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे

स्पर्धकांच्या धमाकेदार परफॉर्मन्सेससोबतच आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांच्यातली जुगलबंदी महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे. विशेष म्हणजे महाअंतिम सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, रोहन रोहन, पंकज पडघन, कौशल इनामदार उपस्थित रहाणार आहेत. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा महाअंतिम सोहळा ८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT