Subodh Bhave Post, Vaalvi Marathi Movie video.. Instagram
मनोरंजन

Subodh Bhave: '31 डिसेंबरच्या रात्री...' सुबोध भावेच्या पोस्टनं चर्चेला उधाण

सुबोध भावेनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याला दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

प्रणाली मोरे

Subodh Bhave: नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरु झाला तोच मुळी सरत्या वर्षाला म्हणजेच ३१ डिसेंबरला जल्लोषात टाटा-बाय बाय करत.. अनेकांनी मोठ मोठे प्लॅन करत धुरळा उडवला असणार हे नक्की आणि त्यातले काहींचे प्लॅन फिसकटले असणार हे देखील तितकंच खरं...

नवीन वर्षात राग-रुसवे त्यामुळे सुरुही झाले असतील...पण असो..त्यातही गम्मत असते.

प्रत्येकजण आज एकमेकांना ३१ डिसेंबरला रात्री काय,कसं सेलिब्रेट केलं याविषयी नक्की विचारणार..नो डाऊट. आता सुबोध भावेनं थेट सोशल मीडियावर ३१ डिसेंबरच्या रात्री काय घडलंय..याचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

पण त्यासोबत त्यानं जोडलेली व्हिडीओ पोस्ट पाहिली की आपल्या चेहऱ्यावर मात्र हसू उमलणार हे नक्की...चला जाणून घेऊया सुबोध भावेच्या त्या पोस्टविषयी.(Subodh Bhave Post, Vaalvi Marathi Movie video..)

सुबोधनं व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये काय लिहिलंय ते जाणून घेऊया. सुबोध म्हणाला आहे...''३१ डिसेंबरचा तुमचा काय प्लॅन? या चौघांचा प्लॅन तर साफ फिसकटलाय..बघूया आता पुढे काय होतंय...''

आता एव्हाना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल ही पोस्ट आहे सुबोधच्या आगामी सिनेमाविषयीची. ज्याचं नाव आहे 'वाळवी'. या बहुचर्चित सिनेमाचं दिग्दर्शन केलंय मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशीनं.

आणि यात काम करत आहेत मराठीतील दोन प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी,सुबोध भावे आणि त्यांच्यासोबत दिसणार आहेत मराठीत चर्चेत असलेल्या अभिनेत्री अनिता दाते आणि शिवानी सुर्वे.

गेल्या काही दिवसांपासून 'वाळवी' सिनेमाच्या प्रोमोंनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमाच्या प्रोमोवरनं काहीतरी इंट्रेस्टिंग कथानक असणार हे जरी कळत असलं तरी सिनेमाच्या जॉनरचा मात्र थांगपत्ता लागताना दिसत नाही. सिनेमा रोमॅंटिक आहे,सस्पेन्स थ्रिलर आहे आहे की कॉमेडी काही कळेनासं झालंय. आणि म्हणून तर उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

आता सुबोध भावेनं वाळवी सिनेमाची व्हिडीओ पोस्टकेलीय ती पाहिली की लक्षात येईलच की ३१ डिसेंबरची रात्र 'वाळवी' सिनेमातही दाखवलीय अन् त्या दिवशी काही तरी घडलंय...आता ते काय घडलंय हे पहायला नवीन वर्षात पुढचे काही दिवस म्हणजे १३ जानेवारी पर्यंत वाट पहावी लागणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल नाही, पुस्तके वाचा; १८ वर्षांपूर्वी मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका! नितीश भारद्वाज यांचा पालकांना सल्ला

Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक

Live Updates Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा, भक्ती आणि सेवाभावाचा दिला संदेश

PMPML Financial Crisis: पीएमपीचा गाडा ‘उधारी’वर, उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट; ठेकेदार, इंधनाचे ३०० कोटी रुपये थकले

Mumbai-Ahmedabad: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १५ तास भीषण कोंडी! प्रवाशांचे अन्न-पाण्याविना हाल; २० किमीपर्यंत वाहनरांगा

SCROLL FOR NEXT