Chahatt Khanna  Esakal
मनोरंजन

Sukesh Chandrasekhar: सुकेश चंद्रशेखरने 'या' अभिनेत्रीवर ठोकली १०० कोटीची कायदेशीर नोटीस

सकाळ डिजिटल टीम

महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आजवर अनेक खुलासे झाले. यात जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही एवढेच नाही तर टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना निक्की तांबोळी, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांच्या नावाचाही यात समावेश आहे. त्यात आता आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री चाहत खन्ना हिला १०० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अभिनेत्री चाहत खन्ना हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार चाहत खन्ना आपली प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप सुकेशने केला आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, सुकेशने तिला तिहार तुरुंगात लग्नासाठी प्रपोज केले होते.

याबाबत सुकेश चंद्रशेखर यांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, चाहतच्या वक्तव्यामुळे सुकेशच्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच सुकेशला मानसिक त्रासही झाला आहे. वकिलाने सांगितले की, ज्या केसमध्ये सुकेशला आरोपी बनवण्यात आले आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत कोणताही आरोपी दोषी सिद्ध होऊ शकत नाही आणि त्या आरोपीविरुद्ध कोणतीही व्यक्ती टिप्पणी करू शकत नाही. चाहत खन्ना इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्यासाठी आणि तिच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सर्व करत आहे.

वकिलाने पुढे ,सांगितले की, चंद्रशेखर यांच्या वकिलाने सांगितले की, चाहत खन्नाला कायदेशीर नोटीस पाठवून सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अभिनेत्रीला सात दिवसांच्या आत सुकेशची माफी मागणारे निवेदन जारी करावे लागेल. चाहतने असं न केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

चाहत खन्ना नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सुकेश चंद्रशेखरवर अनेक आरोप केले होते. तिने सांगितले होते की, तिला मुंबईहून दिल्लीला बोलावण्यात आले ती दिल्लीला पोहोचल्यावर पिंकी इराणी हिने तिला तिहार तुरुंगात तिची सुकेशशी भेट करुन दिली. तुरुंगात सुकेशने चाहतला प्रपोज केले आणि त्याला तिच्या मुलांचा बाप व्हायचे आहे. असं सांगितलं. असे अनेक आरोप तिने सुकेशवर केले होते. आता या दाव्यावर सुकेशने तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT