Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez  Esakal
मनोरंजन

Valentine day 2023: जेलमध्ये सुकेशलाही आली जॅकलीनची आठवण..फिल्मी अंदाजात अभिनेत्रीला पाठवला प्रेमसंदेश

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात अडकलेल्या सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिन फर्नांडिस सोबतचं नातं आता लपून राहिलेलं नाही.

प्रणाली मोरे

Sukesh Chandrashekhar: कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर आणि बॉलीवूडची श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील प्रेमाचं नातं कुणापासून आता लपून राहिलेलं नाही. एक वेळ होती जेव्हा दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.

सुकेश सध्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात तुरुंगात आहे. पण असं असलं तरी जॅकलिनसाठी अनेकदा तो पत्र लिहितो आणि तिची आठवण काढताना दिसतो. मग व्हॅलेंटाईन डे कसा विसरेल बरं सुकेश.

सुकेशनं आज आपल्या लेडी लव्हची आठवण काढलीय बरं का. त्यानं कोर्टातून आपल्या लेडीलव्हला म्हणजे जॅकलिना एका प्रेमसंदेश पाठवला आहे.(Sukesh Chandrashekhar wishes jacqueline fernandez on valentine day from court sit?)

आता आपल्या मनात प्रश्न निर्माण नक्कीच झाला असेल की हे कसं शक्य आहे. तर चला,आम्ही तुम्हाला सांगतो की हे कसं शक्य झालं. त्याचं झालं असं की आज सुकेशला केसनिमित्तानं कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

यादरम्यान पत्रकारांशी बातचीत करताना त्यानं जॅकलिनला व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुकेशला पत्रकारांनी जॅकलिनशी असलेल्या संबंधावर प्रश्न केले तेव्हा तो म्हणाला,'' माझ्याकडून जॅकलिनला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा''. आणि याव्यतिरिक्त आपल्याला जॅकलिन विषयी इतर काहीच बोलायचे नाही असं देखील सुकेश म्हणाला.

जॅकलिन फर्नांडिसचा उल्लेख करत कॉनमॅन म्हणाला,''जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा आपण त्या व्यक्तीचं संरक्षण करण्याचा देखील प्रयत्न करता,त्याच्याबाबतीत कोणतीच चुकीची गोष्ट ज्यानं त्या व्यक्तीला त्रास होईल असं काहीच तुम्ही करत नाही''.

सुकेशला जेव्हा विचारलं गेलं की नोरा फतेहीला तू पैसे दिले होतेस का? तेव्हा तो म्हणाला,''मी सोनं खोदून काढणाऱ्यांवर बोलत नाही''.

सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात करोडो रुपयांची जबरदस्तीनं वसूली केल्याचा आणि एका बिझनेसमनच्या पत्नीची फसवणूक केल्याची मोठी केस करण्यात आली आहे.

सुकेश तिहार जेलमध्ये बंदी आहे. आज त्याच्या केस संदर्भात कोर्टात सुनावणी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

Ambegaon farmer loan waiver: आंबेगावात १,५७८ शेतकऱ्यांना ९ कोटी ८५ लाखांची कर्जमाफी; आधार प्रमाणीकरण अनिवार्य

Ambegaon Nagapur leopard rescue: नागापूरजवळ विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याचा थरारक बचाव; वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

SCROLL FOR NEXT