sumeet raghvan and chinmayee sumeet in kbc marathi decide to their children study in marathi medium SAKAL
मनोरंजन

Sumeet Raghvan: दोन्ही मुलांना मराठी शाळेतच दाखल करण्याचा निर्णय, सुमीत - चिन्मयी उलगडणार किस्से

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी गप्पा रंगणार आहेत

Devendra Jadhav

Sumeet Raghvan In KBC Marathi News: जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य.

या आठवड्यात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळणार आहेत.

या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. प्रेक्षकांची हि आवडती जोडी होणार करोडपती मध्ये एकत्र येणार आहेत.

(sumeet raghvan and chinmayee sumeet in kbc marathi)

सुमित राघवन यांनी त्यांच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरवात केली. या विशेष भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांनी त्यांना समाजाप्रती असलेल्या भावना आणि विषय या मंचावर मांडले.

चिन्मयी सुमित यावेळी मराठी शाळांबद्दल व्यक्त झाल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेतच का दाखल केले याबद्दल त्या म्हणाल्या.

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे नेहमी चर्चेचा विषय असलेली जोडी आता कोण होणार करोडपातीच्या मंचावर येत आहे. यावेळी सचिन खेडेकरांसोबत त्यांच्या कमाल गप्पा रंगल्या.

सुमित राघवन च्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरवात झाली त्यानंतर नर्मदा नवनिर्माण अभियान यांचासाठी हा करोडपतीचा खेळ सुमित आणि चिन्मयी खेळणार आहेत.

सचिन खेडेकरांसोबत चिन्मय आणि सुमित यांच्या सुंदर गप्पा रंगल्या. सुमित आणि चिन्मयी ची भेट कशी झाली त्यांनी त्यांच्या करियर ची सुरवात कशी केली याबद्दल धमाल किस्से आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळणार आहेत.

मराठी शाळांचे महत्व यावेळी सुमित आणि चिन्मयी यांनी पटवून दिले. मराठी शाळा टिकवणे किती महत्वाच्या आहेत याबद्दल ते बोलले.

नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राऊंड पेर्फोमन्स करणारी हि सुमित आणि चिन्मयी यांची जोडीचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग 22 जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

जिंकलेली रक्कम ते नर्मदा नवनिर्माण अभियान यांना देणार आहेत. आता नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

'कोण होणार करोडपती' चा हा विशेष भाग, शनिवार २२ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता बघायला मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT