Sunny Deol viral video  Esakal
मनोरंजन

Sunny Deol: 'अरे बाप रे सनी देओल'! नगरच्या शेतकऱ्यांने तारा सिंगला ओळखलचं नाही.. video Viral

Vaishali Patil

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओल अमिषा पटेलसोबत 'गदर 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शुटिंगचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

सनीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मजेदार व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. तो एका माणसाला भेटला ज्याने सनीला ओळखलेच नाही आहे. सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सनी देओल आणि त्याची टीम महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात बैलगाडी चालवणाऱ्या एका माणसाला थांबवतात. व्हिडिओमध्ये कोणीतरी त्या व्यक्तीला विचारत आहे की तु कसा आहेस आणि तो बैलगाडीवर काय घेऊन जात आहेस. त्यावर माणसाने उत्तर दिले की तो जनावरांसाठी ज्वारीची भुसा घेवुन जात आहे. यानंतर सनी त्या व्हिडिओमध्ये येतो आणि त्या व्यक्तीशी हातमिळवणी करतो.

त्यानंतर सनीने त्याला विचारले की तू कुठे जात आहेस आणि तो म्हणाला, 'तू सनी देओलसारखा दिसतोस.' यावर सनी हसतो आणि म्हणतो, 'हो, मी आहे.' सनी देओलला भेटून त्या माणसाला आश्चर्यचा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, 'अरे बाप रे. तुमचा आवाजपण सेम आहे' सनी म्हणाला, 'मी इथे आलोय, मला माझ्या गावाची आठवण आली.' यावर तो म्हणाला, 'आम्ही तुमचे व्हिडीओ आणि तुमचे वडील धर्मेंद्र यांचे व्हिडिओ ऑनलाइन पाहतो.'

त्या व्यक्तीसोबतचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत सनीने लिहिले, 'अहमदनगरमध्ये गदरच्या शूटिंगदरम्यान.' या पोस्ट थोड्यावेळातच व्हायरल झाली आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

'गदर 2' हा हिट अॅक्शन ड्रामा 'गदर'चा सिक्वेल असून, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

अमेरिकेची दाढीवर बंदी! लष्कराचं नवं ग्रूमिंग धोरण, शीख, मुस्लिम सैनिकांसमोर प्रश्नचिन्ह

Rashmika-Vijay Engagement : रश्मिका-विजयने गुपचुप उरकला साखरपुडा, 'या' महिन्यात बांधणार लग्नगाठ

Diwali Flight Price Hike: दिवाळीत तिकीट दर भिडले आकाशाला; ट्रॅव्हल्स, विमान प्रवास भाडे तिप्पट, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Latest Marathi News Live Update : मुंबई लोकलच्या गर्दीने घेतला जवानाचा बळी

SCROLL FOR NEXT