Sushmita Sen  Google
मनोरंजन

'माझं लग्न एकदा नाही,चक्क ३ वेळा...',सुश्मिता सेनचा लग्नाविषयी मोठा खुलासा

सुश्मिता सेनने ट्विंकल खन्नाच्या ट्वीक इंडिया कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून लग्न न करण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

प्रणाली मोरे

सुश्मिता सेन(Sushmita Sen) ४६ वर्षांची आहे. तिनं अद्याप लग्न केलेलं नाही,परंतु आपल्या दोन दत्तक मुली रेने आणि अलिशाला घडवण्यात मात्र ती कुठेच मागे राहिलेली नाही. दोन मुली हेच तिचं आयुष्य बनलंय. कितीतरी वेळा म्हटलं जातं की या मुलींमुळेच तिनं लग्न केलेलं नाही. पण यावेळी याविषयावर सुश्मिता सेननं चुप्पी तोडत लग्न न करण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली,''तीन वेळा असं झालंय की जवळ-जवळ लग्नाची सगळी तयारी झाली,आता लग्न होणारंच त्यावेळी असं काही घडलं की माझं नववधू बनायचं स्वप्न तिथेच मोडायचं''. पण यासाठी माझ्या मुली नक्कीच कारणीभूत नाहीत.(Sushmita Sen Opens Up About Never Getting Married)

मिस.युनिव्हर्स १९९४ सुष्मिता सेननं स्पष्ट म्हटलं आहे की,तिच्या मुली रेने सेन आणि अलिशा या तिच्या अविवाहीत राहण्याचं कारण कधीच नव्हत्या. माझ्या आयुष्यात तब्बल तीन वेळा लग्न करण्याचे प्रसंग आले पण देवानं मला वाचवलं असं मी म्हणेन.

सुश्मिता सेननं काही महिने आधी आपला बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केलं होतं. अर्थात दोघांमध्ये मैत्री अद्यापही कायम आहे. दोघं अनेकदा एकत्र सेलिब्रेशनच्या निमित्तानं दिसतातही. अभिनेत्रीनं आपल्या ब्रेकअपची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे नातं संपवल्याचं जाहीर केलं होतं. कुठेही तिनं रोहमनला दोष दिले नव्हते. आणि तिचं ते वागणं तिच्या चाहत्यांना खूप भावलं होतं.

सुश्मिता सेनने ट्विंकल खन्नाच्या ट्वीक इंडिया कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं आहे की,''कोणीही यावं आणि माझ्या जबाबदाऱ्या शेअर कराव्यात असं मला कधीच वाटलं नाही,पण कोणी मला माझ्या जबाबादाऱ्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न देखील करु नये,यावर मात्र मी ठाम होते''.

लग्नासंदर्भात बोलताना सुश्मिता सेन म्हणाली,''माझं भाग्य आहे की मला माझ्या आयुष्यात काही चांगल्या मुलांना भेटायचा योग आला. पण त्यांच्याशी लग्न न करण्याचं कारण एवढंच होतं की ते माझ्यासोबत मला फारसे आनंदी वाटायचे नाहीत. काही ना काही कारणानं ते निराश दिसायचे. याच्याशी माझ्या मुलींचा काहीच संबंध नव्हता. माझी मुलं यामध्ये कधीच आली नाहीत. माझ्या दोन्ही मुलींनी माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांचा अगदी मनापासून स्विकार केला आहे,त्यांच्या चेहऱ्यावर कधीच त्याचा ताण मला दिसला नाही. त्यांनी त्या सगळ्यांना एकसारखं प्रेम आणि सम्मान दिला. आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट होती''.

सुश्मिता पुढे म्हणाली,''माझं लग्न तीनदा होता होता राहिलं. तिन्ही वेळा देवानेच वाचवलं. मी त्या तीन लग्नाच्या वेळी नेमकं काय संकटं आली हे नाही सांगू शकत. पण एवढं मात्र नक्की की देवानेच माझं रक्षण केलं आणि तसंच देवानं माझ्या दोन मुलींचे देखील रक्षण करावं. मी माझ्या आयुष्यात चुकीचं काही करू नये हे देवाच्याच मनात होतं''.

१९९४ साली मिस युनिव्हर्स हा किताब जिंकल्यानंतर सुश्मिता सेनने 'दस्तक' सिनेमातून १९९६ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. 'फिजा','आंखे','मैं हूं ना', 'मैंने प्यार किया?' सारख्या तिच्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. २०२० मध्ये आलेल्या 'आर्या' वेब सिरीजमधून तिनं अनेक वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक केलं. या वेबसिरीजचा दुसरा सिझन गेल्या वर्षीच स्ट्रीम झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT